कोवळे ऊन अन् …., रिया चक्रवर्तीच्या नव्या फोटोची सर्वत्र चर्चा

काही दिवसांपूर्वी रियाने आर्यन खानच्या अटकेनंतर एक प्रेरणादायी पोस्ट शेअर केली होती.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे रिया चक्रवर्ती. रिया ही नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच रियाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यात तिच्या दिवसाची सुरुवात कशी होते? याची एक झलक दाखवली आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतंच रियाने इनस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटो तिच्या हातात हनुमान चालीसा दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात हनुमान चालीसाचे वाचन करताना दिसत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी रियाने आर्यन खानच्या अटकेनंतर एक प्रेरणादायी पोस्ट शेअर केली होती. “तुम्ही ज्या गोष्टींमधून (परिस्थितीमधून) जात आहात त्यामधून शिकून पुढे मार्गक्रमण करत राहा,” असे तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.

बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचे निधन होऊन एक वर्ष उलटलं आहे. त्याच्या निधनानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण चर्चेत आलं होतं. यानंतर अनेक मोठमोठ्या कलाकारांची चौकशी करण्यात आली. सुशांत सिंह राजपूतसंबंधित ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीचे नावही समोर आले होते. याप्रकरणी १ महिन्यासाठी तिला तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rhea chakraborty starts her day with hanuman chalisa share a picture nrp