बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची धाकटी लेक रिया कपूरने गेल्या महिन्यात बॉयफ्रेंड करण बुलानीशी लग्न केले. रियाने अगदी साध्या पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, आता रिया आणि करण हे दोघे ही हनीमुनसाठी मालदिवला गेले आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे फोटो रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या पैकी एका फोटोत रियाने बिकिनी परिधान केली आहे. ती स्विमिंग पूलमध्ये आहे. तर करणने तिचा फोटो काढला आहे. हा फोटो शेअर करत 'मुलांना आजीच्या घरी सोडून आली', असे कॅप्शन रियाने दिले आहे. इथे मुलांचा अर्थ त्यांचे पाळिव श्वान आहे. तिच्या या फोटोवर आनंद अहुजा आणि अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. आणखी वाचा : 'तारक मेहता…'मधील भिडे गुरुजी आणि टप्पूमुळे चाहत्यांची चिंता वाढली View this post on Instagram A post shared by Rhea Kapoor (@rheakapoor) आणखी वाचा : 'याला म्हणतात संस्कार', बिग बींची नात आराध्याचा डान्सनंतर भजन गातानाचा व्हिडीओ झाला व्हायरल रिया आणि करणने १४ ऑगस्ट रोजी लग्न केले. रिया आणि करण १२ वर्षापासून एकमेकांना ओळखत आहे. रिया आणि करण यांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केले. कमी पाहुण्यांच्या उपस्थित त्यांनी लग्न केले.