अभिनेता सिल्क स्मिता, संजय दत्त अशा सेलिब्रिटींच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकत बायोपिक साकारण्यात आले आहेत. त्यातच आता आणखी एका चित्रपटाची भर पडली असून, दाक्षिणात्य अडल्ट स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकीला हीच्या आयुष्यावर चित्रपट साकारण्यात येणार आहे. अभिनेत्री रिचा चड्ढा या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असून, काही दिवसांपूर्वीच तिचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

शकीलाने बी आणि सी ग्रेड चित्रपटांमध्ये जास्त काम केलं होतं. त्यामुळे त्यांची प्रतिमाही सुरुवातीच्या काळात फार चांगली नव्हती. वयाच्या २३ व्या वर्षी शकीलाच्या वडिलांचं निधन झालं. ज्यामुळे मनाविरुद्ध त्यांना देहव्यापारात उतरावं लागलं. सात भावंडांना मोठं करण्यासाठी, त्यांना सांभाळण्यासाठी शकीलाला हे पाऊल उचलावं लागलं होतं, असं तिने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

सात भावंडांपैकी सध्याच्या घडीला शकीला सलीम या तिच्या भावाशीच संपर्कात आहे. बहिणीने तिच्याशी कोणताच सपर्क ठेवलेला नाही. तर, तीन भावंडांचं निधन झाल्याचं तिने मुलाखतीत सांगितलं. वयाच्या १८ व्या वर्षी शकीलाने सिल्क स्मितासोबत प्लेगर्ल्स या चित्रपटात काम केलं होतं.

https://www.instagram.com/p/BlvDv29hlG9/

Sacred Games : नेटकऱ्यांनाही पडला प्रश्न, ‘कुक्कू’ खरंच ट्रान्सजेंडर आहे का?

आपण जे काम करत आहोत त्याविषयी इतर लोक काय म्हणतील याविषयी कधी पुसटसा विटारही माझ्या मनता आला नाही. काम मिळत गेलं, चित्रपटांच्या ऑफर येत गेल्या आणि मी ते करत गेले. काही क्षणांचे लव्ह मेकिंग सीन, थोडसं रडणं आणि सर्व ड्रामा हेच चित्रण असणार असल्याचं दिग्दर्शक मला सांगायचे, असं शकीलाने या मुलाखतीत म्हटलं. पुढे जाऊन लव्ह मेकिंग सीनची लोकप्रियता लक्षात घेता दिग्दर्शकांनी त्याच दृश्यांवर भर देण्यास सुरुवात केली. अनेकदा तर, शकीलाला न विचारता दिग्दर्शकांनी बॉडी डबलचा वापर करत या दृश्यांचं चित्रीकरण करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीपासूनच आपलं एक कुटुंब असावं असं स्वप्न शकीलाने पाहिलं होतं. स्वत:ला एका गृहिणीच्याच भूमिकेत ती पाहायची. आपल्या आयुष्याच्या या टप्प्यावर बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. यापैकीच एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करत शकीला म्हणाली, सगळ्यांवरच विश्वास ठेवू नका, अगदी तुमच्या कुटुंबावरही.