Rihanna Dior Bag Controversy: जागतिक स्तरावरील पॉप आयकॉन रिहाना (Rihanna) सध्या तिच्या भारत भेटीमुळे आणि अंबानी कुटुंबासोबतच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. रिहाना तिच्या ‘फेन्टी ब्युटी’ ब्रँडच्या लाँचसाठी मुंबईत आली असताना तिने मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ (Antilia) या निवासस्थानी भेट दिली. यावेळी तिने पारंपारिक पद्धतीने पूजा, आरती आणि फुलांची होळी साजरी केली. मात्र, एका विशिष्ट फोटोमुळे सध्या सोशल मीडियावर वादाचे तोंड फुटले आहे. या फोटोमध्ये रिहाना गाईला चारा भरवताना दिसत आहे, पण तिच्या हातात ४.३ लाख रुपये किमतीची ‘डिओर’ (Dior) कंपनीची बॅग आहे. ही बॅग वासरू आणि कोकराच्या कातड्यापासून बनवण्यात आली असल्याने एका बाजूला प्राण्यांची हत्या करून बनवलेली वस्तू वापरणे आणि दुसऱ्या बाजूला गोसेवा करणे, यावरून नेटकऱ्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले आहे.

मुंबईत आलेल्या रिहानाने मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या घरी भेट दिली. यावेळी तिने गायीला चारा भरवला. तिचे अँटिलियामधील अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. फोटो पाहिल्यावर तिच्या हातातील त्या महागड्या बॅगने लोकांचे लक्ष वेधून घेतले. गायीची सेवा करताना तिच्याजवळ प्राण्यांच्या कातड्यापासून बनलेली बॅग होती. इंटरनेटवर अनेकांनी या प्रसंगाला अत्यंत विरोधाभासी आणि चुकीचं म्हटलंय, तर काहींनी मात्र यात काहीच चुकीचं नाही.

या भेटीदरम्यान रिहानाने इतरही अनेक विधी केले. तिने पूजा केली, आरती केली आणि फुलांच्या पाकळ्या वापरून ‘फुलांची होळी’ साजरी केली. तिचे स्वागत पारंपरिक नृत्याने करण्यात आलं. यावेळी रिहानाने गायीला चारा भरवतानाचा तो छोटासा क्षण सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. तिने पकडलेल्या ४.३ लाख रुपये किमतीची ‘डिओर’ बॅग वासरू आणि कोकराच्या कातड्यापासून बनवलेले आहे. त्यामुळे एका बाजूला प्राण्याबद्दल प्रेम दाखवणं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच कातड्याची बॅग वापरणं, हे काही नेटकऱ्यांना पटलेलं नाही.

पाहा रिहानाचा वादग्रस्त फोटो

यावर युजर्सनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या. अनेक युजर्सनी या विरोधाभास कृतीवर कमेंट्स केल्या आणि तिच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर काहींनी म्हटलं की जगात लक्झरी संस्कृतीमध्ये अशा गोष्टी सामान्य आहेत. या टीकेतून जागरूकता, प्रतीकात्मकता आणि डिजिटल युगात सांस्कृतिक कृतींकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन कसा आहे, हे दिसून येतं असं मत मांडलं.

दरम्यान रिहानाच्या भारत दौऱ्याबद्दल बोलायचं झाल्यास ती तिच्या ‘फेन्टी ब्युटी’ (Fenty Beauty) या ब्यूटी ब्रँडला भारतात लाँच करण्यासाठी मुंबईत आली होती. यादरम्यान तिने ‘अँटिलिया’ला भेट दिली. ईशा अंबानी, श्लोका मेहता, राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्यासह अंबानी परिवाराने तिचे स्वागत केले.