अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला जामनगरमध्ये सुरुवात झाली आहे. १ मार्च ते ३ मार्चदरम्यान हा भव्य सोहळा पार पडणार आहे. या खास कार्यक्रमासाठी बॉलीवूड व दाक्षिणात्य सेलिब्रिटी, क्रीडा जगतातील खेळाडू आणि परदेशी पाहुणेही जामनगरमध्ये आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहानाच्या परफॉर्मन्सने लक्ष वेधून घेतलं आहे.

रिहानाने शुक्रवारी रात्री अनंत व राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात परफॉर्म केलं. तिने तिची काही हिट गाणी सादर केली. तिच्या परफॉर्मन्सला उपस्थितांकडूनही दाद मिळाली. रिहानाच्या परफॉर्मन्सचे काही व्हिडीओ पापाराझी अकाउंट्सवरून शेअर करण्यात आले आहेत.

Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
Hardik Pandya is the captain but Rohit Sharma is always there for the team
IPL 2024 : ‘हार्दिक कर्णधार आहे पण रोहित…’, मुंबई इंडियन्सच्या संघातील वातावरणावर तिलक वर्मा काय म्हणाला?
IPL 2024 Rohit Sharma and Hardik pandya Hugged Each Other Video Went Viral Mumbai Indians
IPL 2024: रोहित-हार्दिकची गळाभेट फक्त व्हिडिओपुरतीच? MI च्या व्हिडिओवरील चाहत्यांच्या कमेंट्सने वेधलं लक्ष
When Russian Girl Came To Meet Dolly Chaiwala and request him in bill gates style one chai please
रशियन मुलीला पडली डॉलीच्या चहाची भूरळ, बिल गेट्सच्या स्टाइलमध्ये म्हणाली “वन चाय प्लीज”; पाहा Video

एका व्हिडीओमध्ये रिहाना अनंत व राधिका यांना या प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी शुभेच्छा देताना दिसत आहे. ‘मी यापूर्वी कधीही भारतात आले नव्हते, मला बोलवण्यासाठी तुमचे आभार’, असंही रिहाना यावेळी म्हणाली.

रिहानाच्या परफॉर्मन्सवर अंबानी कुटुंब थिरकल्याचे पाहायला मिळाले. नीता अंबानी, अनंत अंबानी व राधिका मर्चंट, श्लोका मेहता, आकाश अंबानी, मुकेश अंबानी व त्यांचे जावई आनंद पिरामल हे सर्वजण मंचावर रिहानाबरोबर थिरकले, याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दरम्यान, रिहाना तिचा कार्यक्रम आटोपून आज जामनगरमधून परत रवाना झाली. तिचे विमानतळावरील काही व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये ती भारतातून परत जाताना विमानतळावर पोज देत आहे.