‘आर्ची’ने उलगडले ‘रिंकू’ नावाचे रहस्य

अगदी लहान पोराला विचारलं तरी रिंकू कोण आहे ते सांगेल.

'सैराट' चित्रपटामुळे रिंकूच्या आयुष्याला स्टारडमचे वलय.

नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटामुळे रिंकू राजगुरु हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले आहे. अगदी लहान पोराला विचारलं तरी रिंकू कोण आहे ते सांगेल.
रिंकू राजगुरु या नावाने परिचित असलेल्या या अभिनेत्रीचे खरे नाव काही वेगळेच आहे. याबाबत तिला एका मुलाखतीदरम्यान विचारले असता रिंकू म्हणाली, माझं खरं नाव प्रेरणा राजगुरु आहे. पण प्रेरणा या नावाने मला कोणी ओळखत नाहीत. रिंकू हे माझे टोपणनाव आहे. केवळ घरीच नाहीतर शाळेतसुद्धा मला रिंकू म्हणूनच हाक मारली जाते. पण आता माझी ओळख आर्ची अशीच झाली आहे, असे रिंकू म्हणाली.
रिंकूच्या शाळेच्या दाखल्यावर तिचे नाव प्रेरणा राजगुरु आहे. पण घरच्यांनी लाडाने ठेवलेल्या रिंकू या नावानेच शाळेतील सर्व शिक्षक, मित्रमैत्रिणी हाक मारतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rinku is my petname says sairat fame archie

ताज्या बातम्या