पंढरीची वारी हा अनेकांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र विठुरायाचा गजर सुरू असून. पांडुरंगाचे भक्त भक्तीत तल्लीन होऊन पंढरीच्या दिशेने दर्शन घेण्यासाठी निघाले आहेत. सामान्य माणूस ते अगदी सेलिब्रिटी या वारीत सहभागी होताना दिसत आहे. अशताच आता अभिनेत्री रिंकू राजगुरूसुद्धा यादरम्यान फुगडी खेळताना दिसत आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरवर्षी नेते मंडळी, सेलिब्रिटी ते अनेक लोकप्रिय व्यक्ती वारीमध्ये सहभागी होत असतात. ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीत सामील होऊन वारकऱ्यांबरोबर फुगडी खेळताना दिसतात. अनेक कलाकार त्यांचा वारीचा अनुभव सांगत असतात. अशातच आता रिंकू रागुरूचाही फुगडी खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

रिंकूचा फुगडी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल

रिंकू राजगरू व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सिद्धेश लोकरे यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून यामध्ये दोघे फुगडी खेळताना दिसत आहेत. दोघांनी यावेळी पारंपरिक लूक केला असून वारकऱ्यांबरोबर फुगडी खेळत आनंद साजरा करत आहेत. रिंकूने यावेळी निळ्या रंगाचा खणाची किनार असलेला ड्रेस परिधान करुन सिंपल लूक केला आहे. तिच्या या साधेपणाचं कौतुक होत आहे.

रिंकू नेहमीच तिच्या साधेपणाने अनेकांचं लक्ष वेधून घेते. तिच्या लूकचं आणि साधेपणाचं अनेकदा तिचे चाहते कौतुक करत असतात. सोशल मीडियावरही अभिनेत्री खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी ती शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचे मोठा फॅन फॉलोइंग आहे.

दरम्यान, सध्या राज्यातून मोठ्या संख्येने वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले असून वारीमध्ये सहभागी झाले आहेत. वारकऱ्यांचे फुगडी व इतर पारंपरिक खेळ खेळतानाचे विविध व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असते. गेल्या वर्षी अनेक कलाकारांनी यामध्ये सहभाग घेतला होता आता नेहमीप्रमाणे याही वर्षी तोच उत्साह कायम असल्याचं पाहायला मिळतं.