ऋषी कपूर मुंबईतील रुग्णालयात दाखल

मुंबईत परतताच त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Rishi Kapoor, Rishi Kapoor Death
Rishi Kapoor passes away at 67 : ऋषी कपूर

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी दिल्लीमध्ये चित्रीकरण करत असताना प्रकृती अस्वास्थामुळे ते रुग्णालयात दाखल झाले होते. परंतु उपचार केल्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयातून सूटी देण्यात आली. त्यानंतर ते मुंबईत परतले. आणि मुंबईत परतताच त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गेल्या दोन दिवसांपासून ताप येत असल्यामुळं त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती कपूर कुटुंबीयांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीनं दिली.

सोमवारी ऋषी कपूर यांच्या भाच्याचा विवाह सोहळा पार पडला. त्यावेळी ऋषी कपूर दिसले नाही. शिवाय मंगळवारी झालेल्या रिसेप्शन पार्टीत देखील ऋषी कपूर दिसले नाहीत. त्यावेळी त्यांचा मुलगा रणबीर आणि त्यांची पत्नी नितू कपूर उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rishi kapoor admitted in mumbai hospital mppg

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या