ऋषी कपूरनी उडवली झारा ब्रॅण्डची खिल्ली!

ऋषी कपूर यांनी आपली ‘मन की बात’ ट्विटरवर प्रसिध्द केली.

अभिनेता ऋषी कपूर

ट्विटरवरील आपल्या कमेंटस् आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे अभिनेते ऋषी कपूर यांच्या निशाण्यावर सध्या ‘झारा’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड आहे. त्याच झालं असं की, ऋषी कपूर यांना या ब्रॅण्डची प्रमोशनल स्ट्रॅटेजी पसंत पडली नाही. मग काय विचारता, ऋषी कपूर यांनी आपली ‘मन की बात’ ट्विटरवर प्रसिध्द केली. लवकरच सुरू होणाऱ्या आपल्या सेल संदर्भातील छायाचित्रे झाराने सोशल मीडियावर टाकली. यात लो-हाईट टॉप आणि रिप्ड जीन्सच्या छायाचित्राचा समावेश होता. ऋषी कपूर यांनी हे छायाचित्र ट्विटरवर पोस्ट करून त्याखाली “दोन खरेदी करा आणि एक भीक मागण्याचे वाडगे मोफत मिळवा. झाराचा सेल” अशी ओळ लिहिली. ऋषी कपूर यांच्या या ट्विटला आत्तापर्यंत अनेकांनी रिट्विट केले आहे. यात करण जोहरचादेखील समावेश आहे. ट्विटरचा योग्य वापर कसा करावा याचे कौशल्य अभिनेता ऋषी कपूर यांना गवसले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यामुळेच आपल्या ट्विट्समुळे ते सतत चर्चेत असतात. यावेळचे त्यांचे ट्विट झारालादेखील एकदा विचार करण्यास भाग पाडेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rishi kapoor commented on the tweet of fashion brand zara