‘एकतर तुम्ही प्रेमात आहात किंवा दिल्लीत’

जीवघेण्या प्रदूषणावर ऋषी कपूर यांची प्रतिक्रिया

दिल्ली शहर आणि राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात हवेच्या प्रदूषणामुळे श्वास घेणे देखील मुश्कील झाले आहे. येथील वायुप्रदूषणाची स्थिती इतकी खालावली की पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकारणाने संपूर्ण दिल्ली परिसरात आरोग्य आणीबाणी जाहीर केली. या वायुप्रदूषणाविरोधात बॉलिवूड अभिनेता ऋषि कपूर यांनी आवाज उठवला आहे.

ऋषि कपूर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिल्लीतील प्रदूषणाबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. “एकतर तुम्ही प्रेमात आहात किंवा दिल्लीत” अशा मिष्किल शब्दात ट्विटच्या माध्यमातून ऋषी कपूर यांनी प्रतिक्रिया दिली. याआधी अशीच काहीशी तीव्र प्रतिक्रिया अर्जून रामपाल, प्रियांका चोप्रा, स्वरा भास्कर यांनी देखील दिली होती.

अत्यंत गंभीर स्थिती

हवेची गुणवत्ता सरासरी ०-५० इतकी असेल तर हवेची गुणवत्ता श्रेणी उत्तम मानली जाते. ५१-१०० ही श्रेणी समाधानकारक, १०१-२०० मध्यम, २०१-३०० घातक, ३०१-४०० अत्यंत घातक, ४०१-५०० अत्यंत गंभीर अशा श्रेणीमध्ये हवेतील प्रदूषणाची स्थिती मोजली जाते. शुक्रवारी दिल्लीत हवेची गुणवत्ता सरासरी ५०० हूनही अधिक म्हणजेच अत्यंत गंभीर या श्रेणीत होती. वायुप्रदूषणामुळे काळवंडलेल्या दिल्लीत काही फुटांपलीकडे दिसत नव्हते. दृश्यमानता कमी झाल्याने भर दुपारीदेखील वाहनाचालकांना दिवे लावून कार चालवाव्या लागत होत्या. सामान्य दिल्लीकरही मास्क लावून घराबाहेर पडलेले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rishi kapoor on air pollution in delhi mppg

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या