रियान आणि राहिलला जेव्हा बाबा भेटतात, रितेशचा मुलांसोबतचा व्हिडीओ व्हायरल

काही वेळापूर्वी रितेशने ट्वीट करत त्याची पत्नीचे नाव जेनेलिया नाही तर जिनेलिया असल्याचे सांगितले आहे.

riteish deshmukh, genelia deshmukh,
रितेशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जिनेलियाची आहे. हे दोघे ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतान दिसतात. मात्र, यावेळी त्यांचा एक भावनीक व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश त्याची पत्नी जिनेलिया आणि त्याची दोन्ही मुलं दिसतं आहेत. रितेश त्याच्या कुटुंबाला घेण्यासाठी मुंबई विमानतळावर गेल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओत त्याची दोन्ही मुलं धावत येऊन त्याला मीठी मारतात आणि नंतर फोटोग्राफर्सला हात जोडून नमस्कार करताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘तारे जमीन पर’ या चित्रपटातील ‘तारे जमीन पर’ हे गाणं प्ले होतं आहे. रितेशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील ‘या’ आलिशान रेस्टॉरंटमध्ये असते बॉलिवूड कलाकारांची रेलचेल!

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


दरम्यान, या आधी ट्वीटकरत रितेशने त्याच्या पत्नीचे नाव सगळी प्रसार माध्यम जेनेलिया लिहितात. मात्र, त्याच्या पत्नीचे नाव हे जिनेलिया आहे. रितेश आणि जिनेलिया यांना दोन मुलं आहेत. रियान आणि राहिल अशी त्यांची नाव आहेत.

आणखी वाचा : प्रियांका अमेरिकावासियांना खाऊ घालतेय ‘मुंबईचा वडापाव’, किंमत ऐकून पळून जाईल भूक

रितेश गेल्या वर्षी टायगर आणि श्रद्धा कपूरच्या ‘बाघी ३’ या चित्रपटात दिसला. सध्या रितेश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ट्रिलॉजीवर काम करत असल्याचे म्हटले जातं आहे. एवढंच नाही तर लवकरच आपल्याला रितेशला एका हॉरर-कॉमेडी पटात ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार असल्याचे म्हटले जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Riteish deshmukh and his son s looking adorablein viral video dcp