बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूजा. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी जिनिलियाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये रितेश प्रिती झिंटाला मिठी मारताना दिसत होता. ते पाहून जेनेलियाला राग येतो आणि घरी पोहोचल्यावर ती रितेशची चांगली धुलाई करते असे दाखवण्यात आले होते. आता या व्हिडीओवर जिनिलियाने वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच रितेश आणि जिनिलिया यांनी अरबाज खानच्या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये जिनिलिया, रितेश आणि प्रिती झिंटा मिठी मारत असलेल्या व्हिडीओ विषयी बोलताना दिसते. ‘रितेश आणि प्रिती गप्पा मारत होते. मी मागे उभी होते आणि दुर्दैवाने एका कॅमेरा मॅनने माझे हावभाव त्याच्या कॅमरामध्ये रेकॉर्ड केले’ असे जिनिलिया म्हणाली. या व्हिडीओमुळे जिनिलियाला ट्रोल देखील करण्यात आले होते.

काय होता व्हिडीओ?
जिनिलियाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख अभिनेत्री प्रिती झिंटाला मिठा मारतो आणि तिच्याशी गप्पा मारताना दिसत होता. त्याचवेळी जेनेलिया तेथे मागे उभी असते. ते पाहून जेनेलियाला राग येतो आणि घरी पोहोचल्यावर ती रितेशची चांगली धुलाई करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत होता.

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणून रितेश आणि जिनिलियाकडे पाहिलं जातं. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात एकत्र काम असताना हे दोघे रिलेशनशिपमध्ये आले. त्यानंतर ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये ते लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले. रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ते नेहमीच सोशल मीडियवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh and prity zinta hug each other genelia dsouza react avb
First published on: 28-09-2021 at 19:01 IST