scorecardresearch

कपिलने विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नाचे उत्तर देताना रितेश देशमुख म्हणाला, “तुमच्याकडे प्लॅन सी…”

३० सप्टेंबर रोजी ‘प्लॅन ए प्लॅन बी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

कपिलने विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नाचे उत्तर देताना रितेश देशमुख म्हणाला, “तुमच्याकडे प्लॅन सी…”
फोटो सौजन्य – Instagram Sony Entertainment Television

छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ सुरु झाला आहे. या कार्यक्रमाने गेल्या अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन केले आहे. काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा त्याच्या काहीशा नव्या टीमसह पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे नवनवे उच्चांक गाठलेले आहेत. कपिल शर्मा शोच्या नव्या पर्वामध्ये आतापर्यंत अक्षय कुमार, रकुल प्रीत सिंह, राधिका आपटे, सैफ अली खान, हुमा कुरेशी अशा कलाकारांना हजेरी लावली आहे. दरम्यान या आठवड्यामध्ये प्रदर्शित होणाऱ्या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

‘द कपिल शर्मा शो’च्या नव्या भागामध्ये मराठमोळा रितेश देशमुख आणि दाक्षिणात्य सुंदरी तमन्ना भाटिया त्यांच्या ‘प्लॅन ए प्लॅन बी'(Plan A Plan B) या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी उपस्ठित राहिले आहेत. त्यांच्यासह चित्रपटातील अन्य कलाकारांनी देखील या शोला हजेरी लावली आहे. प्रोमोमध्ये कपिल तमन्ना भाटियाच्या स्वागतासाठी ‘बदन पे सितारे लपेटे हुए ओ जान-ए-तमन्ना किधर जा रहे हो’ हे गीत गाताना दिसत आहे. त्यानंतर रितेश ‘त्याला माझ्यासाठी पण गाणं गा की’ असे म्हणतो. त्यावर कपिल त्याची मस्करी करत एक जुनाट गाणं गातो. प्रोमोमध्ये दाखवलेल्या एका सीनमध्ये कपिल रितेश देशमुखला “निर्मात्यांचा जर प्लॅन ए चालला नसता, तर त्यांच्याकडे प्लॅन बी होता का” असा गमतीदार सवाल केला. त्यावर रितेशने हसत-हसत स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी त्यांना ‘तुमच्याकडे प्लॅन सी आहे ना.. असे विचारले होते’ हे उत्तर दिले.

‘प्लॅन ए प्लॅन बी’ हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये रितेशने लोकांचे घटस्फोट करवून देणाऱ्या वकीलाचे, तर तमन्नाने वधुवरसूचक मंडळ चालवणाऱ्या मॅचमेकरचे पात्र साकारले आहे. दोन विरुद्ध जगात जगणाऱ्या या दोन पात्रांची प्रेमकथा चित्रपटामध्ये दाखवलेली आहे. चित्रपटामध्ये कुशा कपिला आणि पूनम ढिल्लों यांनी सहायक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

आणखी वाचा – दीपिका पदुकोण ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये दिसणार का? अयान मुखर्जीने केला मोठा खुलासा

३० सप्टेंबर रोजी ‘प्लॅन ए प्लॅन बी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Riteish deshmukh and tamanna bhatia attended the kapil sharma show to promote their upcoming film plan a plan b yps

ताज्या बातम्या