Riteish Deshmukh Post For Genelia Deshmukh : रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. दोघांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्यातील केमिस्ट्रीचं, त्यांच्या नात्याचं अनेक जण कौतुक करत असतात. रितेश व जिनिलीयाला महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनीही म्हटलं जातं. अशातच आता जिनिलीयाच्या वाढदिवसानिमित्त रितेशने खास पोस्ट शेअर केली आहे.

रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांच्यातील बाँड, त्यांचा एकमेकांवरचा विश्वास हा त्यांच्या मुलाखतींमधून, त्यांनी शेअर केलेल्या फटो, व्हिडीओमधून दिसून येतो. ज्याचं अनेकदा कौतुक होतं आणि यामुळे ते चर्चेतही असतात. रितेश अनेकदा बायकोची काळजी घेताना दिसतो. त्यामुळे अनेकदा त्याचंही यासाठी त्याचे चाहते कौतुक करतात. मनोरंजनविश्वात अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी घटस्फोट घेत असताना या जोडीची केमिस्ट्री, त्यांच्या नात्याचं उदाहरण दिलं जातं. याचदरम्यान बायकोच्या वाढदिवसानिमित्त रितेशने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे.

रितेशची जिनिलीयासाठीची पोस्ट चर्चेत

रितेशने जिनिलीयाच्या वाढदिवसानिमित्त मिश्कील अंदाजात पोस्ट शेअर केली आहे. फोटोच्या कॅप्शनने लक्ष वेधलं आहे. यामधून त्याने त्याचं वय वाढत आहे मात्र जिनिलीया जशी होती तशीच आहे असं म्हटलं आहे. जिनिलीयाबरोबरचे गोड फोटो शेअर करत रितेश म्हणाला, “प्रिय बायको. आपण एकत्रित घालवलेले क्षण, आठवणी या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना मला जाणवलं की फक्त माझं वय वाढत आहे तू मात्र आजही तशीच आहेस. पण मग मला कळलं की यामागचं कारण तुला चांगला नवरा मिळाला आहे.” यावेळी रितेशने गंमतीत स्वत:चं कौतुक केलं आहे.

रितेशने पुढे “संपूर्ण कुटुंबाला एकत्र धरुन ठेवणाऱ्या व्यक्तीला, एक सर्वोत्कृष्ट आईला, चांगल्या मुलीला आणि माझ्या वेड्या बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”. असं म्हटलं आहे. रितेशने यावेळी त्यांच्या दोन मुलांबरोबरचे आणि काही रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत.

दरम्यान, रितेश व जिनिलीया अलीकडेच त्यांच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटातून एकत्र झळकले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. मराठी इंडस्ट्रीतीलही अनेक लोकप्रिय कलाकार यामधून झळकले होते. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली.