“भाजपाने असा निर्णय घेतला आहे की, एकनाथ शिंदे गटाला आम्ही समर्थन देणार असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील,” अशी घोषणा दुपारी राजभवनामधील पत्रकार परिषदेत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. या घोषणेनंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. गुरुवारी संध्याकाळी राजभवनात हा शपथविधी पार पडला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय, सामाजिक आणि सर्व सामान्य जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. नुकंतच अभिनेता रितेश देशमुख याने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता रितेश देशमुख हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकतंच रितेश देशमुखने ट्विट करत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी रितेशने दोन ट्विट केले आहे. त्यातील एका ट्विटमध्ये रितेशने एकनाथ शिंदेंचा फोटो शेअर केला आहे. “श्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा”, असे त्याने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे.

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Sharad Pawar On PM Narendra Modi
“पेट्रोलचे दर ५० दिवसात कमी करणार असं मोदी म्हणाले होते, आता तीन हजार दिवस..”, शरद पवारांचा सवाल
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
nitish kumar narendra modi
“आम्ही खोटं-खोटं…”, पंतप्रधान मोदींकडे इशारा करत नितीश कुमारांनी युतीबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत; नेमकं काय म्हणाले?

प्रसाद ओकने दिल्या महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा, ‘धर्मवीर’मधील खास फोटो शेअर करत म्हणाला…

त्यापाठोपाठ रितेश देशमुखने देवेंद्र फडणवीसांचा एक फोटो शेअर केला आहे. यात त्याने फडणवीसांचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “श्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आज आपण शपथ घेतली. आपले खूप खूप अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा”, असे ट्विट रितेश देशमुखने केले आहे.

फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली पोस्ट, म्हणाल्या…

दरम्यान गुरुवारी एकनाथ शिंदे हे दुपारी गोव्यातून मुंबईत परतले. शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतरच्या नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाने शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. सायंकाळी साडेसात वाजता राजभवनामध्ये शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला शिवसनेच्या बंडखोर आमदारांपैकी कोणीही उपस्थित नव्हतं. त्यामुळेच शपथविधीनंतर मध्यरात्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांना भेटण्यासाठी थेट गोव्याला पोहोचले.

शिवसेना नेते अनुपस्थित

नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभाला मावळते मुख्यमंत्री उपस्थित राहतात. परंतु, शिवसेनेतील बंडामुळे मुख्यमंत्रीपद गमवावे लागल्याची उद्विग्नता उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याने शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखेच होते. यामुळेच मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा मावळत्या मंत्रिमंडळातील कोणीही यावेळी उपस्थित नव्हते.