scorecardresearch

“लग्न करुन संकटाचा सामना…”; रितेशने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, जिनिलियाची ‘ती’ कमेंट चर्चेत

रितेशचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख यांची जोडी ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. रितेश आणि जिनिलिया हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. ते दोघेही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असता. नुकतंच रितेशने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

रितेशने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या रिल व्हिडीओत तो गर्लफ्रेंड आणि पत्नी याबाबत सांगताना दिसत आहे. यात तो म्हणतो की गर्लफ्रेंड ही कमकुवत लोकांची असते. पण शूर लोक तर लग्न करुन संकटाचा सामना करतात. यावेळी तो पहिलं वाक्य बोलून झाल्यानंतर कॅमेरा जिनिलियाच्या दिशेने वळवतो. या व्हिडीओ त्याचे हावभाव अतिशय मजेशीर पाहायला मिळत आहे.

हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानच्या गोव्यातील हॉटेलचा INSIDE व्हिडीओ पाहिलात का?

रितेशने हा व्हिडीओ शेअर करताना ‘दर के आगे जीत है’ असे कॅप्शन दिले आहे. त्यासोबत त्याने हा व्हिडीओ जिनिलियालाही टॅग केला आहे. त्यावर जिनिलियानेही कमेंट करत ‘किती वाईट’ असे म्हटले आहे. दरम्यान रितेशचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

घटस्फोटाच्या ६ महिन्यानंतर समांथाने शेअर केला नागाचैतन्यसोबतचा खास फोटो, म्हणाली…

रितेशने तासाभरापूर्वी शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंट पाहायला मिळत आहे. त्यासोबतच या व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असल्याचे दिसत आहे. तसेच अनेकांनी रितेशच्या या व्हिडीओवर मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

दरम्यान रितेश देशमुखचा ‘मिस्टर मम्मी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून त्याची पत्नी जिनिलिया डिसूझा देखील बऱ्याच काळानंतर अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार आहे. दोघंही बऱ्याच काळानंतर पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहे. हा एक विनोदी चित्रपट असून यात जिनिलिया आणि रितेश दोघंही गरोदर असल्याचं दाखवण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Riteish deshmukh share funny video about girlfriend and wife difference genelia deshmukh comment nrp