scorecardresearch

‘ए करोना व्हायरस देणाऱ्या देशा’, रितेश देशमुखचा तो मजेशीर व्हिडीओ व्हायरल

रितेशने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

riteish deshmukh, riteish deshmukh viral video,
रितेशने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रितेश सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच रितेशने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश सेटवरच्या काही लोकांसोबत Guess The Country हा इन्स्टाग्रामवर असलेला फिल्टर वापरत असल्याचे दिसत आहे. यावेळी तिथे एका चेनचं चिन्ह असतं आणि त्याच्यापुढे A हे अक्षर असतं. तर यावेळी रितेश आणि त्याचे काही साथी हा कोणता देश असेल असं म्हणतं अनेक नावं घेतात. त्यानंतर त्यांना कळतं की तो चीन देश आहे. तेव्हा रितेश बोलतो “ए करोना व्हायरस देणाऱ्या देशा” आणि तिथे असलेले सगळे लोक हसू लागतात.

आणखी वाचा : Video : ‘पुष्पा’तील सामी सामी गाण्यावर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींनी केला भन्नाट डान्स

आणखी वाचा : मन्नतमध्ये घुसून ‘तो’ स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत होता, शाहरुख आला तर म्हणाला, “मला फक्त…”

दरम्यान, रितेश नेहमीच त्याची पत्नी जिनिलियाचे मजेशीर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. रितेश ‘बाघी ३’ या चित्रपटात दिसला आहे. तर लवकरच तो अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Riteish deshmukh shares video with guessing the name of country went viral dcp

ताज्या बातम्या