बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणजेच रितेश देशमुख आणि जिनिलिया देखमुख सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. दोघांचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. नुकतीच रितेश आणि जिनिलियाने अरबाज खानच्या ‘पिंच’ या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी अरबाजने सोशल मीडियावर जिनिलियाला ‘चीप, निर्लज्ज आणि असभ्य काकू’ उल्लेख केलेल्या एका युजरची कमेंट वाचली. ही कमेंट ऐकून जिनिलियासह रितेश देखील हैराण झाला.

युजरच्या या कमेंटवर जिनिलियाने तिचं उत्तर दिलं होतं. ‘मला असं वाटतंय की घरात त्याला चांगली वागणूक दिली जात नाही. भाऊ, आशा आहे की तुम्ही ठीक आहात. खूप निराश आहे बिचारा’ असं उत्तर जिनिलियाने दिलं होतं. तर यावर रितेश देशमुखनेदेखील त्याच्या स्टाइलने उत्तर दिलंय. रितेशने अरबाजला या युजरचं नाव विचारलं. यावर ‘युनिवर्स योगा’ असं युजरचं नाव असल्याचं अरबाज म्हणाला. युजरचं नाव ऐकून रितेश म्हणाला, “या युजरला खरोखरच योगा करण्याची गरज आहे. त्याने कपालभाति, शवासन केलं पाहिजे” असं रितेश म्हणाला.

‘लोकांनी माझं वजन कमी करण्याचं श्रेय माझ्या ब्रेकअपला दिलं’; अभिनेत्रीने व्यक्त केली खंत


KBC 13: जेव्हा बिग बींना विनातिकीट प्रवास करताना टीसीने पकडलं होतं; शेअर केला धमाल किस्सा

दरम्यान अरबाज खानच्या या शोमध्ये जिनिलियाने रितेश आणि प्रिटी झिंटाच्या मिठी मारतानाच्या व्हायरल व्हि़डीओवर देखील प्रतिक्रिया दिली. या व्हायरल व्हिड़ीओत जिनिलियाने हावभाव पाहून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. यावर ती म्हणाली, “आता मी काहीही बोलले तरी लोकांना ते फेक वाटेल. मात्र खरी गोष्ट अशीय की मी खूप मोठ्या काळाने अवॉर्ड फंक्शनल गेले होते. चांगला ड्रेस आणि हिल्स घालून गेले होते. मला वाटलं होतं मी त्यात कंफर्टबेल राहिन. मात्र इतक्या सर्व लोकांना भेटणं त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यात मी उंच टाचांच्या सॅण्डल घातल्या होत्या त्यामुळे माझ्या पायांची अवस्था वाईट झाली होती. त्यात रितेश आणि प्रिती झिंटा जेव्हा गप्पा मारत होते आणि दुर्दैवाने एका कॅमेरा मॅनने माझे हावभाव त्याच्या कॅमरामध्ये रेकॉर्ड केले’ असे जिनिलिया म्हणाली.

तर “त्या सोहळ्यात खुपच आवाज असल्याने प्रिती काय बोलत होती हे एकू न आल्याने मी तिच्या जवळ गेलो. मला कल्पना नव्हती नंतर सहा महिने या व्हिडीओची चर्चा होईल” असं रितेश म्हणाला. रितेश, जिनिलिया आणि प्रितीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे जिनिलियाला ट्रोल करण्यात आलं होतं.