जेनेलिया की मार्व्हल? नेमकं तुझ्या आईचं नाव काय? ; रितेशला पडला प्रश्न

वाचा त्याचं ट्विट

ritiesh with his son
रितेश देशमुख व त्याचा मुलगा राहिल

बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जेनेलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. या जोडीकडे पाहिले की जेनेलिया आणि रितेश एकमेकांसाठीच बनले आहेत, हे कोणीही मान्य करेल. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. त्यांचा मुलगा राहील याचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त रितेशने सोशल मीडियावर त्याचे फोटो पोस्ट करत अनोख्यारित्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘राहील बेटा, जेव्हा तुझा जन्म झाला, तेव्हा डॉक्टर येऊन म्हणाले की, शुभेच्छा तुमच्या घरी सुपरहिरोचा जन्म झाला आहे. गेल्या वर्षी तू कॅप्टन अमेरिका होतास आणि आता यावर्षी स्पायडर मॅन आहेस. मी विचार करतोय की तुझ्या आईचं नाव जेनेलिया आहे की मार्व्हल?’, अशा मजेशीर अंदाजात रितेशने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटसोबतच रितेशने राहीलचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

रितेश- जेनेलियाने २०१२ मध्ये लग्न केलं. सोशल मीडियाद्वारे ही जोडी नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. या दोघांना दोन गोंडस मुलं आहेत. रियान आणि राहील अशी या मुलांची नावं असून राहील आता चार वर्षांचा झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Riteish deshmukh unique birthday wishes for his son rahyl ssv

Next Story
गॉसिप