Ritesh Deshmukh share throwback picture as he completes 20 years on meeting Genelia Deshmukh nrp 97 | 'मी जे करतो त्याला प्रेम नाही...'; रितेश देशमुखच्या पोस्टने वेधले सर्वांचेच लक्ष, जिनिलियाने कमेंट करत दिले उत्तर | Loksatta

‘मी जे करतो त्याला प्रेम नाही…’; रितेश देशमुखच्या पोस्टने वेधले सर्वांचेच लक्ष, जिनिलियाने कमेंट करत दिले उत्तर

या फोटोवरील कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘मी जे करतो त्याला प्रेम नाही…’; रितेश देशमुखच्या पोस्टने वेधले सर्वांचेच लक्ष, जिनिलियाने कमेंट करत दिले उत्तर

बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यातील प्रेम दिसून येते. रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. रितेश हा नेहमी त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतंच रितेश देशमुखने एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोवरील कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर जिनिलियासोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. यात पहिला फोटो हा जिनिलिया आणि रितेश यांनी नुकताच काढलेला आहे. तर दुसरा फोटो हा फार जुना त्यांच्या एखाद्या चित्रपटातील असल्याचे दिसत आहे. या फोटोला रितेश फार हटके कॅप्शन दिले आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

या फोटोला कॅप्शन देताना रितेश म्हणाला, ‘२० वर्षापूर्वी, आज…जेव्हा हे सर्व सुरू झाले…., मी जे करतो त्याला प्रेम नाही ‘वेड’ म्हणतात’. रितेशच्या या पोस्टवर जिनिलियानेही कमेंट केली आहे. ‘जसं जसं वयं वाढलं तसं कळलं की या वेडेपणाला प्रेम म्हणतात….’, अशी हटके कमेंट जिनिलियाने केली आहे.

दरम्यान रितेश आणि जिनिलियाची इन्स्टाग्रामवर ही रोमँटिक पोस्ट पाहून चाहते भारावले आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेक कलाकारांसह विविध कमेंट पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या पोस्टवर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

“अनेक पुरुषांना नीट किस करता येत नाही कारण…”, ‘बिग बॉस’मधील अभिनेत्रीचे वक्तव्य चर्चेत

‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात रितेश आणि जिनिलियाने पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्याच निमित्ताने ते पहिल्यांदाच हैदराबाद विमानतळावर भेटले. मात्र यावेळी जिनिलियाचे वागणे रितेशला फार काही पटले नाही. त्याने स्वत:हून तिच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला मात्र जेनेलियाने त्याच्याकडे थोडेसे दुर्लक्ष केले. परंतु पुढे जसजसे एकमेकांना त्यांचे स्वभाव कळत गेले तसे त्यांच्यातले प्रेम खुलले. २०१२ मध्ये ते लग्न बंधनाता अडकले. त्या दोघांना रियान आणि रेहाल अशी दोन मुले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-02-2022 at 18:27 IST
Next Story
“गंगूबाई पाहिल्यानंतर बाबा मला म्हणाले..”, आलियानं सांगितली महेश भट्ट यांची ‘ती’ पहिली प्रतिक्रिया!