Robbie Coltrane old video got viral on social media after his death rnv 99 | रॉबी कॉलट्रेन यांना आधीच लागली होती मृत्यूची चाहूल? म्हणाले, "पुढील ५० वर्षांनी मी नसेन पण..." | Loksatta

‘हॅरी पॉटर’ फेम रॉबी कॉलट्रेन यांना आधीच लागली मृत्यूची चाहूल? म्हणाले होते, “पुढील ५० वर्षांनी मी नसेन पण…”

‘हॅरी पॉटर’ या चित्रपटात हॅग्रिड हे पात्र साकारणारे अभिनेते रॉबी कॉलट्रेन यांचं वयाच्या ७२व्या वर्षी निधन झालं. ‘हॅरी पॉटर’मधील त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली.

robbie

‘हॅरी पॉटर’ या चित्रपटात हॅग्रिड हे पात्र साकारणारे अभिनेते रॉबी कॉलट्रेन यांचं वयाच्या ७२व्या वर्षी निधन झालं. ‘हॅरी पॉटर’मधील त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली. त्यांचा या चित्रपटातील अंदाज आणि विनोदी शैली लोकांनी चांगलीच डोक्यावर घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे सगळ्या वयोगटातील व्यक्तींसाठी ते आपलेसे झाले. त्यांच्या निधानाच्या बातमीने प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आणले. प्रेक्षकांबरोबरच डॅनियल रॅडक्लिफ आणि एमा वॉटसन अशा अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. अशातच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्यांनी त्यांचं हॉगवर्ट्सबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा : शाहरुख खानच्या ‘जवान’ने रचला नवा विक्रम, प्रदर्शनाआधीच चित्रपटाने कमावले ‘इतके’ कोटी

त्यांचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘रिटर्न टू हॉगवर्ट्स’ रियुनियन स्पेशलच्या वेळचा आहे. या व्हिडीओत त्यांचे ‘हॅरी पॉटर’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी शूट केलेल्या काही बिहाईंड द सीन्स व्हिडीओ क्लिप्स आहेत. तसेच ‘हॅरी पॉटर’ चित्रपटाच्या शूटिंगच्या अनुभवाबद्दल ते बोलताना दिसत आहेत. या व्हिडीओत ते म्हणतात, “‘हॅरी पॉटर’च्या शूटिंगचा तो १० वर्षांचा काळ माझ्यासाठी खूप खास होता. हॅरी पॉटर ही एक परंपरा आहे जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहणार आहे. हा चित्रपट माझी मुलं बघतील, नंतर त्यांची मुलं बघतील…पुढील ५० वर्षांनी मी या जगात नसेन पण हॅग्रिड नक्कीच जिवंत रहील.” हे सगळं बोलत असताना ते खूप भावुक झाले आहेत. तसेच ‘हॅरी पॉटर’च्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी ते या चित्रपटाच्या टीममधील सदस्यांना मिठीही मारताना दिसत आहे.

हेही वाचा : ‘हॅग्रिड’च्या आठवणीत हॅरी पॉटर आणि हर्माईनी भावुक, पोस्ट शेअर करत वाहिली श्रद्धांजली

२०११ मध्ये रॉबी यांना त्याच्या चित्रपटातील योगदानाबद्दल ‘बाफता स्कॉटलंड पुरस्कार’ देऊन सन्मानित केलं होतं. रॉबी यांनी १९७९ मध्ये आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांना बीबीसीच्या ‘A kick up the eighties’ या विनोदी सीरिजमुळे खरी ओळख मिळाली. याबरोबरच त्यांनी इतरही काही सिरियल्स आणि चित्रपटात बऱ्याच भूमिका केल्या. पण आजही हॅरी पॉटर हे पुस्तक न वाचलेला आणि चित्रपट न पाहिलेला प्रेक्षकही त्यांना ‘रुबियस हॅग्रिड’ म्हणूनच ओळखतो. ‘हॅरी पॉटर’मधील त्यांचं पात्र लोकप्रिय झालं असलं तरी त्यांनी इतरही बऱ्याच चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. जेम्स बॉन्डच्या २ बॉन्डपटात ‘गोल्डनआय’ आणि ‘द वर्ल्ड इज नॉट इनफ’ या दोन्ही चित्रपटातील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-10-2022 at 16:48 IST
Next Story
“माझ्या सासूबाई…” आई होण्याच्या प्रश्नावर प्रार्थना बेहरेचे स्पष्ट उत्तर