धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याने शेवटच्या चेंडूवर षटकार मारुन भारताला न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या टी -२० सामन्यात विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये टी -२० मालिका जिंकण्याचा विक्रम केला.

या विजयाचा आनंद संपूर्ण देशवासीयांसोबतच बॉलिवूडचे महानायाक अमिताभ बच्चन देखील साजरा करत आहेत. त्यांनी ट्विटरव्दारे आपला आनंद व्यक्त केला. रोहित शर्माने मारलेल्या शेवटच्या षटकाराचा उल्लेख करत अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये भारतीय क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

‘अविश्वसनीय’ असे म्हणत केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासात शेकडो नटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अखेरच्या दोन चेंडूवर रोहितचे षटकार; असा रंगला सुपर ओव्हरचा थरार

सुपर ओव्हर टाकण्यासाठी भारताकडून जसप्रीत बुमराह आला होता. तर न्यूझीलंडकडून फलंदाजीसाठी विल्यम्सन आणि गप्टिल हे अनुभवी फलंदाज आले होते.

  1. पहिल्या चेंडूर एक धाव
  2. दुसऱ्या चेंडूवर अवघी एक धाव. पहिल्या दोन चेंडूत न्यूझीलंडला फक्त दोन धावा करता आल्या
  3. तिसऱ्या चेंडूवर विल्यम्सने लगावला षटकार. न्यूझीलंडच्या आठ धावा
  4. चौथ्या चेंडूवर विल्यम्सनने लगावला चौकार. न्यूझीलंडच्या बारा धावा
  5. पाचव्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात एक धाव. न्यूझीलंडच्या १३ धावा
  6. अखेरच्या चेंडूनर विल्यम्सनने लगावला चौकार, न्यूझीलंडच्या १७ धावा

न्यूझीलंडकडून गोलंदाजीसाठी टीम साऊदी आला होता. फलंदाजासाठी भारताकडून रोहित शर्मा आणि राहुल आले. भारताला विजयासाठी १८ धावांची गरज.

  1. पहिल्या चेंडूवर भारताने दोन धावा घेतल्या.
  2. दुसऱ्या चेंडूवर फक्त एक धाव. भारताच्या तीन धावा. दोन चेंडूवर रोहित शर्माला फक्त तीन धावा करता आल्या.
  3. तिसऱ्या चेंडूवर राहुलने लगावला चौकार. भारताच्या सात धावा. विजयासाठी तीन चेंडूत ११ धावांची गरज
  4. चौथ्या चेंडूवर राहुलने एक धाव काढली. भारताच्या ८ धावा. विजयासाठी दोन चेंडूत दहा धावांची गरज
  5. पाचव्या चेंडूवर रोहित शर्मानं लगावला खणखणीत षठकार. भारताच्या १४ धावा. विजयासाठी एका चेंडूत चार धावांची गरज
  6. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी चार धावांची गरज असताना रोहित शर्माने लगावला षटकार. भारताच्या २० धावा.