दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘आरआरआर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसत आहे. दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर १२ दिवसात ९३९.४१ कोटींची कमाई केली आहे. तर हिंदीमध्ये डब केलेल्या या चित्रपटाने १९६ कोटींचा गल्ला जमावला आहे.

या चित्रपटामुळे अनेक हिंदी चित्रपट अक्षरश: आपटले आहेत. अभिनेता जॉन अब्राहमचा ‘अटॅक’, अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करता आलेली नाही. विशेष म्हणजे RRR हा चित्रपट लवकरच १००० कोटींचा गल्ला जमवेल अशी आशा निर्माते आणि दिग्दर्शकांना आहे. त्यामुळे सर्वांचेच डोळे त्याकडे लागले आहे.

‘चंद्रमुखी’तील ‘बत्ताश्या’ची भूमिका साकारणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘हा’ अभिनेता, व्हिडीओ व्हायरल

RRR हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर २५ मार्चला प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच अनेक चाहत्यांना ‘आरआरआर’ चित्रपटाबद्दल उत्सुकता होती. ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे या चित्रपटाने आतापर्यंत १२ दिवसात तेलुगू भाषेत ३५३ कोटींची कमाई केली आहे. तर तामिळमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ६५ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यापाठोपाठ कन्नड भाषेत ७५ कोटींचा कमाई या चित्रपटाने केली आहे.

‘RRR’ चित्रपटावेळी घडली धक्कादायक घटना, चित्रपट अर्धवट दाखवल्याचा समीक्षकाचा आरोप

मात्र येत्या ७ दिवसात बॉक्स ऑफिसवर आणखी काही चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या १३ एप्रिलला अभिनेता थालापथी विजयचा ‘बीस्ट’, त्यानंतर १४ एप्रिलला केजीएफ २ आणि शाहिद कपूरचा जर्सी हे तीन चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे आरआरआर या चित्रपटाकडे फक्त १२ एप्रिलपर्यंत कमाई करण्याची संधी असल्याचे बोललं जात आहे.

RRR चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्व भाषांमध्ये ७०० कोटी रुपयांचा गल्ला जमवेल, असे मत तज्ञांनी व्यक्त केले होते. तसेच हा चित्रपट ‘बाहुबली २’चा ८०० कोटींचा रेकॉर्ड मोडू शकणार नाही, असेही तज्ञांचे म्हणणे होते. मात्र या चित्रपटाने आतापर्यंत हे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. या चित्रपटाने जगभरात पहिल्याच आठवड्यात ७०९.३६ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंत १२ दिवसात या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ९३९.४१ कोटींची कमाई केली आहे.