RRR Star Ram Charan praised By Fans For Clicking Selfies With Kids Of An Indian Army Martyr | Loksatta

Video: राम चरणने शहीद कर्नल संतोष बाबूंच्या मुलांसह घेतला सेल्फी; अभिनेत्याच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं

राम चरण गलवान व्हॅलीत वीरमरण आलेले दिवंगत कर्नल संतोष बाबू यांच्या मुलांबरोबर सेल्फी काढताना दिसत आहे.

Video: राम चरणने शहीद कर्नल संतोष बाबूंच्या मुलांसह घेतला सेल्फी; अभिनेत्याच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं
(फोटो – व्हिडीओतून स्क्रीन शॉट्स)

राम चरण हा लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता आहे. त्याच्या ‘आरआरआर’ चित्रपटामुळे तो मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. दरम्यान, आता त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि त्या व्हिडीओमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. अभिनेता राम चरणला नुकतंच एका पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं. आता त्या सोहळ्यातीत एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये तो २०२० मध्ये गलवान व्हॅलीत वीरमरण आलेले दिवंगत कर्नल संतोष बाबू यांच्या मुलांबरोबर सेल्फी काढताना दिसत आहे.

YouTube Poster

व्हिडिओमध्ये राम त्यांच्याजवळून मोबाईल फोन घेऊन त्यांच्याबरोबर पोट्रेट आणि लँडस्केप मोडमध्ये सेल्फी क्लिक करताना दिसत आहे. त्याच्या या कृतीवर प्रतिक्रिया देत एका चाहत्याने त्याला उत्तम व्यक्ती आणि जेंटलमन म्हटलंय. चाहते त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत कौतुक करत आहेत. रामने सोनू सूद आणि नेहा कक्कर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीत एनडीटीव्हीचा फ्यूचर ऑफ यंग इंडिया पुरस्कार जिंकला. यावेळी त्याने केलेली ही कृती लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर आरआरआर चित्रपटाने जगभरात तब्बल १२०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाचं जगभरात भरभरून कौतुक केलं जातंय. याशिवाय चित्रपटाने २०२२ अटलांटा फिल्म क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार जिंकला आहे.

Photos: रशियाच्या राजधानीत ‘पुष्पा’चा जलवा! अल्लू अर्जुनचा खास सन्मान

राम चरणच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो सध्या दिग्दर्शक शंकरबरोबर त्याच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे. या चित्रपटात कियारा अडवाणीची देखील भूमिका असेल. यात रामचरण एका IAS अधिकाऱ्याची भूमिका करत असल्याचं म्हटलं जातंय.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 11:38 IST
Next Story
उत्तर कोरिया: के-ड्रामा, अमेरिकी चित्रपट पाहिले म्हणून विद्यार्थ्यांना भरचौकात मृत्यूदंड; शिक्षा पाहणं स्थानिकांना केलं बंधनकारक कारण…