“मला सतत धमक्या येतात की…”; रुबिना दिलैकची पोस्ट चर्चेत

गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये रुबीना करोनामुक्त झाली होती.

बिग बॉस १४ ची विजेती रुबिना दिलैक सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते ‘शक्ती’ या हिंदी मालिकेतून घराघरात पोहचलेल्या रुबिनाला बिग बॉसमुळे देखील चांगलीच प्रसिद्धी मिळाली. रुबिना ही तिच्या फिटनेसची नेहमीच काळजी घेताना पाहायला मिळते. मात्र काही दिवसांपूर्वी रुबिनाला करोनाची लागण झाल्यानतंर तिचे वजन वाढले आहे. यामुळे तिला ट्रोलही केले जात आहे. मात्र नुकतंच रुबिनाने ट्रोर्ल्सला सडेतोड उत्तर दिले आहे. “ज्यांना माझे काम आणि मेहनतीपेक्षा फिटनेस जास्त महत्त्वाची वाटते, त्यांनी स्वत:ला माझे चाहते म्हणणे बंद करावे,” असे रुबिना म्हणाली.

रुबिनाने नुकतंच तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यावर ती म्हणाली, “माझ्या प्रिय हितचिंतकांनो, माझे वाढलेले वजन तुम्हाला फार त्रास देत आहे, हे मी खूप दिवसांपासून पाहत आहे. त्यामुळेच तुम्ही मला सतत द्वेष करणारे मेल्स आणि मेसेज पाठवत आहात. जर मी एखादा पीआर देत नाही किंवा स्पॉटिंग टिप्स देत नाही तर तुम्हाला माझ्यातील क्षमता दिसत नाही. मला सतत धमक्या दिल्या जात आहे की आम्ही तुझे चाहते राहणार नाही. याचे कारण मी आता लठ्ठ झाली आहे, चांगले कपडे घालत नाही आणि मोठे प्रोजेक्ट्स मिळवण्यासाठी कोणतीही मेहनत करत नाही. पण चाहत्यांच्या या वागण्यामुळे मी खरंच निराश झाली आहे,” असे तिने सांगितले.

“कारण तुम्हाला माझ्यातील योग्यतेपेक्षा किंवा माझ्या कामापेक्षा माझे शारीरिक स्वरुप तुम्हाला महत्त्वाचे वाटत आहे. पण माझ्याकडे तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे, हे माझे आयुष्य आहे आणि त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत. तुम्हीही माझ्या आयुष्याचा एक भाग आहात. मी माझ्या चाहत्यांचा आदर करते. मात्र ज्यांना माझ्या काम आणि मेहनतीपेक्षा फिटनेस जास्त महत्तवाची वाटते, त्यांनी स्वत:ला माझे चाहते म्हणणे बंद करावे,” असेही तिने सांगितले.

“ब्लाऊज का उलटं घातलंस?”, वेडिंग लूकमुळे आलिया झाली ट्रोल

दरम्यान गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये रुबीना करोनामुक्त झाली होती. यावेळी तिने माझे वजन फार वाढलं असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले होते की, माझे वजन ७ किलोने वाढले आहे. त्यामुळे तिला स्वतःला अस्वस्थ वाटत आहे. तसेच यामुळे माझा आत्मविश्वासही कमी झाला आहे. दरम्यान करोनामुक्त झाल्यानंतर ती कामावर परतली आहे. नुकतेच तिचे शाहरुख खानसोबतचे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rubina dilaik slams trolls for fat shaming her says i am disappointed nrp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या