रुचिरा जाधव मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटांत काम केलं आहे. अलीकडेच अभिनेत्री ‘मामाच्या गोव्याला जाऊया’मधून झळकली होती. अभिनयासह रुचिरा तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. अशातच आता तिने तिच्या डाएटबद्दल, फिटनेसची काळजी कशी घेते याबद्दल सांगितलं आहे.

रुचिरा जाधव अेकदा तिच्या आवडत्या पदार्थांबद्दल, फिट राहण्यासाठी ती काय करते याबद्दल सांगत असते. अशातच आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने ती फिटनेस फ्रीक नसून तिला जे आवडतं ते ती खाते असं म्हटलं आहे. रुचिरा नेमकं काय म्हणाली आणि तिच्या फिटनेसमागचं रहस्य काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

रुचिरा फॉलो करत नाही कोणताही डाएट

रुचिरा जाधवने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली आहे. यावेळी तिने सांगितलं की सध्या ती किकबॉक्सिंग शिकत आहे त्यामुळे खूप भूक लागते. पण ती घरचंच जेवण जेवते आणि कुठलाही ठरावीक डाएट प्लॅन फॉलो करत नाही. ती म्हणाली, “मी अजिबात ठरावीक डाएट वगैरे करत नाही. आता इथे आलीये मी खाणार आहे पण मला अजिबात पश्चाताप वगैरे नाहीये कारण मला माहीत आहे की मी दोन तीन महिन्यांनंतर हे खात आहे आणि रोज मी व्यायाम करत असल्याने माझं शरीर इतकं तर पचवू शकतंच.”

वर्कआऊट आधी या दोन पदार्थांचं करते सेवन

रुचिलाला पुढे ती चाहा पिते का असं विचारल्यानंतर मी म्हणाली, “मी दिवसातून एकदा चाहा पिते त्यात साखर असते आणि संध्याकाळी कॉफी पिते. वर्क आऊट करण्याआधी केळी आणि ब्लॅक कॉफी असं घेते पण कितीही थकलेली असले तरी यावर चाहा, कॉफी घेत नाही.” तिला पुढे चिट डेला काय खाते असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “माझा चिट डे असं काही नसतं मला जेव्हा वाटतं तेव्हा मी खाते आणि तरी उत्तर द्यायचं झालं तर चार्टमध्ये मला पाणीपुरी खायला आवडतं. आई घरी करते. पाणी पुरी मला खूप आवडते.” रुचिराने यावेळी तिला वडापावसुद्धा खूप आवडतो असं सांगितलं आहे.

रुचिराची आवडती भाजी कोणती?

रुचिराला पुढे असा कोणता पदार्थ आहे जो ती रोज खाऊ शकते असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “भाजी भाकरी.” त्यानंतर तिला आवडती भाजी कोणती असं विचारल्यानंतर अभिनेत्री म्हणाली, “लोकांना कदाचित हे ऐकून धक्का बसेल पण मला शिमला मिर्चची भाजी आवडते आणि भाकरी. शिमला मिर्च त्यात बटाट, टोमॅटो आणि त्याला फोडणी अशी बनवलेली भाजी आवडते”.