छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचे लाखो चाहते आहेत. या मालिकेत अनिरुद्ध आणि अरुंधतीप्रमाणे संजना या पात्रावरही प्रेक्षक अतोनात प्रेम करताना दिसतात. संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले ही याच पात्रामुळे घराघरात प्रसिद्ध झाली आहे. पण तुम्हाला माहितीये का? अभिनेत्री रुपाली भोसलेच्या आधी या मालिकेसाठी एका प्रसिद्ध अभिनेत्रीला विचारणा करण्यात आली होती. पण तिने नकार दिल्यामुळे रुपालीला ही भूमिका मिळाली. सिनेसृष्टीत कधी, कोणती भूमिका लोकप्रिय होईल, याचा काहीही अंदाज नसतो. सध्या छोट्या पडद्यावरील सर्वच मालिकांमध्ये खलनायिका म्हणून विविध अभिनेत्री दिसत आहे. या मालिकांमुळे त्या अभिनेत्रींना एक वेगळी ओळखही मिळाली आहे. अभिनेत्री रूपाली भोसले ही 'आई कुठे काय करते' या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे. तिची ही भूमिका सर्वत्र चर्चेत आहे. “तू माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग, लव्ह यू…”; ‘लागिर झालं जी’ मधील अज्याची ‘मन झाल बाजींद’ मालिकेच्या ‘कृष्णा’साठी खास पोस्ट 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या सुरुवातीला अभिनेत्री दिपाली पानसरे ही संजनाची भूमिका साकरत होती. मात्र दिपालीने करोनाच्या पार्श्वभूमीवर मध्येच मालिका सोडली. करोनाचा प्रादुर्भाव असताना शूटिंग करण्याची रिस्क नको, असं सांगत तिने मालिका सोडली होती. त्यानंतर निर्माते दिग्दर्शक हे संजनाच्या भूमिकेसाठी विविध अभिनेत्रींचा शोध घेत होते. त्यावेळी त्यांनी अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांना या पात्रासाठी विचारणा केली होती. सुलेखा तळवलकर यांचे या पात्रासाठी नाव प्रचंड चर्चेत होते. मात्र त्यांनी ही भूमिका साकारण्यासाठी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे रुपाली भोसलेची या पात्रासाठी निवड करण्यात आली. सुलेखा तळवलकर यांच्या नकारामुळेच संजनाचे पात्र हे रुपाली भोसलेला मिळाले. पण रुपालीने मिळालेल्या या संधीचे सोने केले. सध्या 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनिरुद्ध, अरुंधती या पात्रांसोबतच संजना हे नावही घराघरात पोहोचले आहे. संजनाचे नाव घेतल्याशिवाय ही मालिका अपूर्ण वाटते. दरम्यान सुलेखाने या भूमिकेसाठी नकार का दिला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. “मला माफ करा, मी यापुढे…”; पान मसालाच्या जाहिरातीवरुन ट्रोल झाल्यानंतर अक्षय कुमारने दिले स्पष्टीकरण सुलेखा तळवलकर या सध्या 'दिल के करीब' या युट्यूब शोमध्ये काम करत आहे. यात त्या विविध कलाकारांच्या मुलाखती घेत असतात. सुलेखाने या आधी सरस्वती या मालिकेत नकारात्मक भूमिका केली होती. त्यासोबतच 'अवंतिका', 'असंभव', 'माझा होशील ना' आणि 'सांग तू आहेस का' या मालिकांमध्येही सुलेखाने खलनायिकेची भूमिका साकारली होती.