scorecardresearch

“वहिनी काय बॅटिंग….” ऋतुराज गायकवाडच्या खेळीनंतर सायली संजीवच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

‘बस बाई बस’ या कार्यक्रमात तिने यावर खुलासा केला होता

“वहिनी काय बॅटिंग….” ऋतुराज गायकवाडच्या खेळीनंतर सायली संजीवच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

ऋतुराज गायकवाडने सोमवारी कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळली. विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने यूपीविरुद्ध १५९ चेंडूत नाबाद २२० धावांची खेळी केली. ज्यामध्ये १० चौकार आणि १६ षटकार लगावले. त्याने एकाच षटकात ७ षटकारांसह ४३ धावा केल्या. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५ गडी गमावून ३३० धावा केल्या आहेत.

ऋतुराजच्या या दमदार खेळीचं कौतुक सगळीकडे होत आहे, मात्र दुसरीकडे एका मराठी अभिनेत्रीला ऋतुराजच्या या खेळीवरून लक्ष केले जात आहे. ती अभिनेत्री म्हणजे सायली संजीव, नुकतीच ती हर हर महादेव चित्रपटात दिसली होती. सायली सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते. आता तिच्या फोटोवर नेटकरी कमेंट करू लागले आहेत. एकाने लिहले आहे “आज आपल्या मित्राने ऋतुराज गायकवाड ६,६,६,६,६,६,६ असे ७ सिक्स मारले भारी बॅटिंग केली.” तर दुसऱ्याने “सामना बघितला का वाहिनी, काय बॅटिंग केली आहे आमच्या भावाने.” तिसऱ्याने लिहले आहे “७ सिक्स एका षटकात ते पण ऋतुराज गायकवाडने” अशा कमेंट्स केल्या आहेत.

“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सायली संजीवला ओळखले जाते. सायली आणि ऋतुराजच्या अफेअरच्या चर्चा गेल्या आयपीएलपासून रंगल्या आहेत. ऋतुराजने सायलीच्या वनपीस घातलेल्या फोटोवर कमेंट केली होती. त्या कमेंटमुळे या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात तिने यावर खुलासा केला होता ती म्हणाली होती की आम्ही दोघे चांगले मित्र आहोत.

सायली संजीव आज चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री मानली जाते. ‘गोष्ट एका पैठणीची’ हा तिचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 18:23 IST

संबंधित बातम्या