scorecardresearch

Chamma Chamma गाण्यात उर्मिला मातोंडकरने घातले होते १५ किलो दागिने अन् ५ किलोचा…

उर्मिला मातोंडकरचा १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘चायना गेट’ या चित्रपटात हे गाणं होतं.

urmila matondkar, chamma chamma,
उर्मिला मातोंडकरचा १९९८ साली प्रदर्शित झालेल्या 'चायना गेट' या चित्रपटात हे गाणं होतं.

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. १९९८ मध्ये ‘चायना गेट’ या चित्रपटातील ‘छम्मा-छम्मा’ या गाण्यामुळे उर्मिला चर्चेत आली होती. झी टिव्हीच्या रिअॅलिटी शो ‘सा रे ग म पा’मध्ये हजेरी लावली होती. सगळ्या स्पर्धकांनी गाणी गायली त्यानंतर अनन्या नावाच्या स्पर्धकाने ‘छम्मा-छम्मा’ गाणं गायलं. हे ऐकल्यानंतर उर्मिलाच्या काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या या विषयीचा एक धक्कादायक किस्सा शेअर केला आहे.

या गाण्यासाठी उर्मिलाने बंजारा स्टाइलचा पोशाख घातल्याचे सांगितले. हे गाणं अल्का याज्ञिक यांनी गायले असून राजकुमार संतोषी यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. उर्मिला या पुढे म्हणाली की या गाण्यासाठी तिला जगभरातून प्रशंसा मिळाली. पण तिचा वैयक्तिक अनुभव चांगला नव्हता. तिने सांगितलं की, ‘माझ्या मैत्रिणीने मला न्यूयॉर्कहून फोन केला आणि सांगितले की पूर्ण चित्रपट पाहताना सगळं चित्रपटगृह शांत होतं. पण जसं गाणं सुरु झालं तेव्हा भारतीयांप्रमाणेच न्यूयॉर्कच्या लोकांनी चक्क पैसे उडवायला सुरुवात केली.

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

आणखी वाचा : “माझ्यावर खर्च करण्यापेक्षा…”, ‘झुंड’साठी अमिताभ बच्चन यांनी केली मानधनात कपात

उर्मिलाने पुढे म्हणाली की, “आम्ही या गाण्यासाठी फोटो सेशन करत असताना दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मला विचारले की, तू खूप दागिने घालणार नाही का? मी त्याला सांगितले की गाण्यातील बंजारा लुकमध्ये ज्वेलरी हा एक आवश्यक भाग आहे. लेहेंगा आधीच ५ किलोचा होता तर दागिन्यांचे वजन हे १५ किलो होते.”

आणखी वाचा : “खरंच प्रार्थना पूर्ण होतायेत असं वाटतंय…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

उर्मिला पुढे म्हणाले की, “राजकुमार संतोषी यांनी तिला हवे असल्यास काही दागिने काढून टाकण्यासाठी सांगितले होते. कारण तिला नंतर लुक बदलता येणार नाही. पण उर्मिलाने ऐकले नाही आणि तिने १५ किलो दागिन्यांसह गाण्याचे शूटिंग सुरू केले. शूटच्या शेवटी, त्या दागिन्यांमुळे संपूर्ण शरीरावर ओरखडे उमटले होते.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sa re ga ma pa urmila matondkar reveals she wore 15 kg jewellery for chamma chamma song and badly hurted her dcp