बॉक्स ऑफिसवर ‘साहो’ सुसाट, पाच दिवसांत कमावले इतके कोटी

बाहुबली फेम प्रभासच्या अफाट लोकप्रियतेपुढे समिक्षकांचे सर्व अंदाज फोल ठरले

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास व अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या दमदार अॅक्शन सीन्सने भरलेला ‘साहो’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. ३५० कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने पाचव्या दिवशी तब्बल ३५० कोटी रुपयांचा आकडा आकडा पार केला आहे.

हिंदी, तेलुगू, तमिळ अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘साहो’ने जगभरातून ३५० कोटी रुपयांची कमाई केली. तर भारतात या चित्रपटाने १०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. साहो प्रदर्शित झाल्यापासून त्याच्यावर समिक्षकांनी टीकेची झोड उठवली होती. काहींना चित्रपटाच्या कथानकाची खिल्ली उडवली तर काहींनी थेट चोरीचा आरोप केला. मात्र सुपरस्टार प्रभासच्या चाहत्यांनी कसलीच पर्वा व करता या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षकांनी चक्क दोन हजारांचेही तिकीट विकत घेऊन चित्रपट पाहिल्याच्या घटना तमिळनाडूमध्ये घडल्या होत्या.

बाहुबली फेम प्रभासच्या अफाट लोकप्रियतेपुढे समिक्षकांचे सर्व अंदाज फोल ठरले, आणि या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ६८ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली. पहिल्याच दिवशी अॅव्हेंजर्स: एंडगेमसारख्या बिग बजेट चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागे टाकणारा हा चित्रपट लवकरच ३०० कोटींच्या घरात पोहोचेल अशी शक्यता वर्तवली जात होती. आणि प्रभास चाहत्यांनी हा अंदाज खरा करुन दाखवला आहे. आता साहोला ५०० कोटींचे वेध लागले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Saaho box office collection day 5 mppg

ताज्या बातम्या