छोट्या पडद्यावरही लगीनघाई; ‘सारे तुझ्याचसाठी’ मालिकेत श्रुती- कार्तिक होणार विवाहबद्ध

या लग्नसोहळ्याचे काही फोटो समोर आले आहेत.

saarey tujyach saathi
छोट्या पडद्यावरही लगीनघाई; ‘सारे तुझ्याचसाठी’ मालिकेत श्रुती- कार्तिक होणार विवाहबद्ध

कलाविश्वात गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्याच लग्नाची चर्चा पाहायला मिळाली. आता छोट्या पडद्यावरही लगीनघाई सुरू आहे. ही लगीनघाई सध्या सोनी मराठीवर सुरू असलेल्या ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. निमित्त आहे श्रुती-कार्तिकचं लग्न.

मालिकेत श्रुती- कार्तिकचा हा विवाहसोहळा २६ नोव्हेंबरला पार पडणार आहे. पण तत्पूर्वी या लग्नसोहळ्याचे काही फोटो समोर आले आहेत. तसं पाहायला गेलं तर हे अरेंज मॅरेज. पण या श्रुती- कार्तिकमध्ये प्रेम कधी उमललं हे त्यांनाही कळलं नाही. साखरपुडा झाल्यानंतर बॉक्सिंगच्या प्रेमाखातर श्रुतीने लग्नापुढे केलेली बॉक्सिंगची निवड आणि त्यामुळे मोडलेला त्यांचा साखरपुडा, नव्याने फुलणाऱ्या या गोड नात्याला पूर्णविराम लागतो की काय असं वाटत असतानाच कार्तिकच्या पुढाकाराने शेवटी हे सुत जुळलं. कार्तिकने श्रुतीच्या सरांना लग्नानंतर श्रुतीच्या बॉक्सिंगवर काहीही परिणाम होणार नाही, असं वचन देत लग्नासाठी परवानगी मिळवली. तुळशीच्या लग्नानंतरचा पहिला मुहूर्त बघून आपल्या लग्नाचा बार उडवून द्यायचा निर्णय घेतला आहे.

वाचा : ‘अन्य’च्या निमित्ताने प्रथमेश परबची बॉलिवूडमध्ये हॅट्रिक

सध्या दोन्ही कुटुंबांमध्ये आता लगीनघाई सुरू झाली आहे. २३ नोव्हेंबरला मेहंदीचा कार्यक्रम आहे. २४ नोव्हेंबरला हळद आणि २६ तारखेला विवाहसोहळा आहे. वेगळे स्वभाव, वेगळी व्यक्तीमत्त्व, विरूध्द टोकाच्या आवडी जोपासणाऱ्या श्रुती – कातिर्कच्या लग्नाची जोरदार तयारी सध्या सोनी मराठीवर सुरू आहे. तेव्हा बॉक्सिंगचा संगीताशी होणारा हा मेळ अनुभवायला ही मालिका पाहावी लागणार.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Saarey tujyach saathi marathi serial shruti and kartik wedding pictures

ताज्या बातम्या