‘साथ सोबत’ पोस्टर प्रकाशित | Saath Sobat movie poster published amy 95 | Loksatta

‘साथ सोबत’ पोस्टर प्रकाशित

चित्रपटांच्या भाऊगर्दीत काही चित्रपट आपली एक वेगळी ओळख जपण्यात यशस्वी होत असतात.

‘साथ सोबत’ पोस्टर प्रकाशित

चित्रपटांच्या भाऊगर्दीत काही चित्रपट आपली एक वेगळी ओळख जपण्यात यशस्वी होत असतात. प्रदर्शनापूर्वीच पुरस्कारांवर आपलं नाव कोरून रसिकांसोबतच समीक्षकांचंही लक्ष वेधून घेतात. प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांचे मन वेधून घेणारा ‘साथ सोबत’ हा चित्रपट १३ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘साथ सोबत’ या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचं नुकतंच अनावरण करण्यात आलं.

प्रसन्न वैद्य यांची प्रस्तुती असलेल्या ‘साथ सोबत’या चित्रपटाची निर्मिती धनजी मारू यांनी मारू एन्टरप्रायझेस या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन रमेश मोरे यांचे आहे. मोरे यांच्या ‘चॅम्पियन्स’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार हे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी ‘साथ सोबत’ पुरवणाऱ्या सवंगडय़ांची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट जगण्याची एक नवी दृष्टी प्रदान करणारा आहे.

राजदत्त, मोहन जोशी, अनिल गवस, संग्राम समेळ, अमोल रेडीज, दिलीप आसुर्डेकर आदी कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. मृणाल कुलकर्णी ही नवोदित अभिनेत्री या चित्रपटातून पदार्पण करत आहे. डीओपी हर्षल कंटक यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे. यशश्री मोरे यांनी लिहिलेल्या गीतरचनांना संगीतकार महेश नाईक यांनी स्वरसाज चढवला आहे. पार्श्वसंगीतही महेश नाईक यांनी दिलं असून, अभिषेक म्हसकर यांनी या चित्रपटाचं संकलन केलं आहे. कौशिक मारू आणि यशश्री मोरे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 01:15 IST
Next Story
लोकसत्ता लोकांकिकेने आत्मविश्वास दिला!