Video : असा तयार झाला दीपिका- रणवीरचा शाही पोशाख

दीपिकाच्या लग्नासाठी पोषाख तयार करताना सब्यासाची आणि त्याच्या टीमनं विशेष मेहनत घेतली.

दीपिका पादुकोन- रणवीर सिंग

दीपिका-रणवीर सिंग भवनानी यांचा विवाहसोहळा नुकताच इटलीत पार पडला. या ग्रँड विवाहसोहळ्यातील प्रत्येक छोटी मोठी गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. सिंधी पद्धतीनं पार पडलेल्या विवाहसोहळ्यात लाल लेहंग्यात लग्नमंडपात आलेल्या दीपिकानं सर्वांचंच लक्ष वेधलं. या लेहंग्यांवर केलेली बारीक कलाकुसर, लाल ओढणीवर असलेल्या आशीर्वादाच्या ओळी प्रत्येक गोष्टीची चर्चा होती.

दीपिकाच्या लग्नातील हा शाही पोशाख प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीनं तयार केला होता. दीपिका गेल्या काही वर्षांपासून सब्यासाची ब्रँडचा चेहरा म्हणून ओळखली जाते. म्हणूनच सब्यासाचीची आवडती मॉडेल दीपिकाच्या लग्नासाठी पोशाख तयार करताना सब्यासाची आणि त्याच्या टीमनं विशेष मेहनत घेतली. १५ नोव्हेंबरला पार पडलेल्या आनंद कारज विधिमध्ये दीपिकानं हा लेहंगा परिधान केला होता.

तो कसा तयार झाला, त्यावरील प्रत्येक बारीक कलाकुसर दाखवणारा व्हिडिओ सब्यासाचीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. याव्हिडिओतून यामागे किती प्रचंड मेहनत होती हे सब्यासाचीनं दाखवलं आहे. या व्हिडिओबरोबरच रणवीर सिंगचाही पेहराव सब्यासाचीनं डिझाइन केला होता.

 

रणवीरसाठी कांजीवरम शेरवानी तयार करण्यात आली होती. तिचाही व्हिडिओ सब्यासाचीनं शेअर केला आहे. कोलकातास्थित फॅशन डिझायनर सब्यसाचीनं आतापर्यंत विराट अनुष्कासह अनेक सेलिब्रिटींसाठी कपडे डिझाइन केले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sabyasachi mukherjee detailed about deepika padukone and ranveer singh marriage cloths

ताज्या बातम्या