‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम घराघरांत आवडीने पाहिला जातो. हा कार्यक्रम बघताना प्रत्येकाला असं वाटत की, मी जर हॉटसीटवर असतो/असते तर एवढी रक्कम नक्कीच जिंकली असती. आता अशीच एक संधी सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे.

१२ जुलैपासून ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सुरू होणार आहे. हा कार्यक्रम पाहताना प्रेक्षक आता घरबसल्या १ लाख रुपये जिंकू शकतात. सोनी लिव्ह या ॲपवर ‘कोण होणार करोडपती’ पाहता-पाहता टीव्हीवर विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं प्ले अलॉंगवर देऊन प्रेक्षक जिंकू शकतात १ लाख रुपये आणि हे जिंकायला एकच गोष्ट तुम्हांला मदत करू शकते, ते म्हणजे तुमचं ज्ञान! कुठेही न जाता, घरात बसून प्रेक्षक या खेळात निवांत सहभागी होऊन लखपती होऊ शकतात.

Nilesh sable said chala hawa yeu dya will come back soon dvr
‘चला हवा येऊ द्या’ येणार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला? निलेश साबळे खुलासा करत म्हणाला, “त्या टीममध्ये सागर कारंडे…”
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

या कार्यक्रमाचं ब्रीद वाक्यच आहे की, ‘आता फक्त ज्ञानाची साथ.’ आता तुमच्या ज्ञानामुळे तुम्ही खरंच लखपती होऊ शकता! कोण होणार करोडपती या कार्यक्रमाबाबात चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. या शोमध्ये अभिनेते सचिन खेडेकर सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत.