scorecardresearch

सचिन पिळगावकर ‘या’ खास नावाने पत्नी सुप्रियाला देतात हाक, वाढदिवसाच्या निमित्ताने झाला खुलासा

सुप्रिया पिळगावकरांच्या वाढदिवसानिमित्त सचिन पिळगावकरांनी त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिन पिळगावकर ‘या’ खास नावाने पत्नी सुप्रियाला देतात हाक, वाढदिवसाच्या निमित्ताने झाला खुलासा
सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर

मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर यांना ओळखले जाते. मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते म्हणून त्यांची गणना केली जाते. सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक अशी ओळख असलेले सचिन पिळगावकर यांचा आज वाढदिवस आहे. विशेष म्हणजे सचिन यांच्यासोबतच त्यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांचाही आज वाढदिवस असतो. सुप्रिया पिळगावकरांच्या वाढदिवसानिमित्त सचिन पिळगावकरांनी त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
पतौडी पॅलेस ८०० कोटी रुपयांना विकत घेण्यामागचे कारण काय? सैफ अली खानने केला खुलासा

सचिन पिळगावकर हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नुकतंच सचिन पिळगावकर यांनी पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट केली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर सुप्रियासोबतचे काही काही खास फोटो शेअर केले आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हे फोटो शेअर करताना सचिन पिळगावकर म्हणाले, “माझ्या अर्धांगिंनीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा सुपर. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे सुप्रिया पिळगावकर.” विशेष म्हणजे सुप्रिया पिळगावकर यांनीही त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत उत्तर दिले आहे. “खूप खूप धन्यवाद”, असे त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

“…कारण द शो मस्ट गो ऑन!” अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या मुलाची भावूक पोस्ट

दरम्यान मराठीतील अत्यंत लोकप्रिय जोडी अशी अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि सचिन पिळगांवकर यांची ओळख आहे. या जोडीने मराठी पडदा गाजवला आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच त्यांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले. सचिन पिळगावकर यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण, सुप्रिया पिळगावकर आणि इतरही बऱ्याच कलाकारांचा सहभाग होता. सचिन पिळगावकर आणि सुप्रिया यांनी ‘अशी ही बनवा बनवी’, ‘माझा पती करोडपती’, ‘आयत्या घरत घरोबा’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आम्ही सातपूते’ यासह अनेक चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sachin pilgaokar birthday wish to wife supriya pilgaokar instagram post viral nrp