मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लाडकी लेक ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी तिचे लाखो चाहते आहेत. सारा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच साराने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमुळे पुन्हा एकदा तिच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता सारा तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याच फोटोमुळे ती चर्चेत आली आहे. यावेळी तिच्यानंतर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स टीमचा सलामीवीर शुभमन गिलने देखील सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आता हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. मात्र, त्या दोघांनी अजुन अधिकृत रित्या त्यांच्या रिलेशनशिपबद्दल सांगितले नाही.

आणखी वाचा : सुपरस्टार होण्यापूर्वी राजेश खन्ना यांच्या घरी AC ठिक करायला गेला होता ‘हा’ अभिनेता

आणखी वाचा : झुलन गोस्वामींच्या बायोपिकमधून अनुष्का करणार कमबॅक, पण टीझर पाहताच नेटकरी म्हणाले…

सारा इंस्टाग्रामवर काही मोजक्या क्रिकेटर्सना फॉलो करते, त्यापैकी एक शुभमन गिल देखील आहे. शुभमन गिलची बहीण शहनील गिल देखील साराच्या इंस्टाग्रामच्या फॉलो लिस्टमध्ये आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच साराने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले आहे. साराचे ते फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar s daughter sara tendulkar is dating cricketer shubman gill dcp
First published on: 07-01-2022 at 13:54 IST