Sagarika Ghatge-Zaheer Khans Son viral video: ‘चक दे इंडिया’ या सिनेमातून अभिनेत्री सागरिका घाटगेने सर्वांची मनं जिंकली. त्यानंतर ती ‘मिले या ना मिले हम’, ‘रश’, ‘इरादा’, ‘फॉक्स प्रेमाची गोष्ट’, अशा चित्रपटांमध्ये दिसली. ‘प्रेमाची गोष्ट’ सिनेमातील अभिनेत्रीची भूमिका चांगलीच गाजली. अभिनेते अतुल कुलकर्णी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते. तसेच, अभिनेत्री सुलेखा तळवलकरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होत्या.
आता अभिनेत्री सागरिका घाटगे चित्रपटांत फारशी दिसत नसली तरी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येते. तसेच ती सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. ती अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करते. पती झहीर खानबरोबरचे तिचे फोटो लक्ष वेधून घेतात. गेल्या वर्षी त्यांना मुलगा झाला आहे. काही वेळा त्याचेही काही सुंदर व्हिडीओ, फोटो पाहायला मिळतात.
सागरिका घाटगे व झहीर खानच्या मुलाला पाहिलंत का?
नुकतीच अभिनेत्री कृतिका कामरा आणि प्रसिद्ध टेलिव्हिजन प्रेझेंटर व क्रिकेट कॉमेंट्रेटर गौरव कपूर यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. मनोरंजन क्षेत्रातील काही कलाकारही या सोहळ्याला उपस्थित होते. मलायका अरोरा, रिया चक्रवर्ती यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती.
याबरोबरच झहीर खान व सागरिका घाटगेदेखील या विवाहसोहळ्याला हजर होते. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचा मुलगाही त्यांच्याबरोबर असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सागरिकाने सुंदर साडी नेसली आहे, तर झहीर व मुलाने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.
नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
व्हायरल भयानीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी सागरिका व झहीरच्या मुलाचे कौतुक केले आहे. एकाने लिहिले, “आईसारखा सुंदर आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “त्याचे डोळे अगदी सागरिकासारखे आहेत”, “तो खूप क्यूट आहे”, एका नेटकऱ्याने लिहिले, “ते किती साधे आहेत”, एकाने लिहिले, “किती गोड आहे”, अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी सागरिकाच्या मुलाचे कौतुक केले आहे. तसेच तो सागरिकासारखा दिसत असल्याचेदेखील चाहत्यांनी म्हणणे आहे.




जवळजवळ दीड वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २००७ मध्ये भारतीय क्रिकेटपटू झहीर खान व अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर सात वर्षांनी त्यांना मुलगा झाला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बाळाचे नावही सांगितले होते. फतेहसिंह खान असे त्याचे नाव आहे.
दरम्यान, सागरिका सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते. तिचा चाहतावर्ग मोठा आहे.
