“आमच्याबद्दल खोटं पसरवून…”, अन्नपूर्णा विठ्ठल यांच्या आरोपावर अखेर सुनील बर्वेंनी सोडले मौन

अनेक मालिकांमध्ये अन्नपूर्णा यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

sahkutumb sahaparivar, annapurna vitthal, sunil barve,
अनेक टीव्ही मालिकांमध्ये अन्नपूर्णा यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी मालिकेच्या कलाकारांवर आणि दिग्दर्शकांवर अनेक आरोप केले आहेत. एवढचं काय तर त्यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली आहे. अन्नपूर्णा यांनी केलेल्या आरोपांनंतर अभिनेता सुनील बर्वे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अन्नपूर्णा यांनी मालिकेच्या निर्मात्याच्या विरोधात मानसिक त्रास आणि छळ केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. दादर पोलीस ठाण्यात २२ नोव्हेंबरला याबाबत लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी त्यांच्या युट्यूब अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत ही माहित दिली आहे. त्यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सुनील बर्वे यांनी प्रतिक्रिया दिली आणि म्हणाले, मी गेल्या अनेक वर्षांपासून या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे, पण माझ्यासोबत असा प्रकार कधीच घडला नाही. आमच्याबद्दल खोटं पसरवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न का करत आहेत, हेच कळत नाही. मालिका सोडणं ही त्यांची निवड होती आणि आम्हाला त्याचे वाईट वाटले. पण, मालिका सोडल्यानंतर त्यांनी असं का केलं, असे व्हिडीओ का बनवले हे आम्हाला माहित नाही.’

आणखी वाचा : शत्रुघ्न सिन्हांची मुलगी होणार सलीम खान यांची सून? सोनाक्षीने केला तिच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा

काय म्हणाल्या होत्या अन्नपूर्णा?

अन्नपूर्णा विठ्ठल यांनी शेअर केलेले हे सर्व व्हिडीओ हिंदीत आहेत. अन्नपूर्णा विठ्ठल यांनी या व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार, “मराठी सिनेसृष्टीत अमराठी कलाकारांना टिकू दिले जात नाही. मी गेल्या महिन्यात सहकुटुंब सहपरिवार ही मालिका सोडली. मात्र ही मालिका सोडल्यानंतर मला मालिकेतून बाहेर काढण्यात अशी अफवा पसरवण्यात आली. या मालिकेत मला मानसिक त्रास देणे, रॅगिंग करणे यात अभिनेत्यांमध्ये सुनिल बर्वे, किशोरी आंबिये, नंदिता पाटकर आणि दिग्दर्शकामध्ये भरत गायकवाड, विठ्ठल डाकवे यासारख्या छोटेमोठे कलाकार यात सहभागी होते. सुनिल बर्वे हा मराठीतील मोठा अभिनेता आहे. पण त्यांनी मला सुरुवातीपासूनच त्रास दिला आहे. इतकच नव्हे तर नंदिता पाटकर आणि किशोरी आंबिये यांनीही मला प्रचंड त्रास दिला,” असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा : निलेश साबळेने पाया पडून मागितली नारायण राणेंची माफी; जाणून घ्या कारण

पुढे त्या म्हणाल्या, “मराठी सिनेसृष्टी तुमची आहे का? मग जर हिंदी, तेलुगु कलाकारांनी मराठी सिनेसृष्टी काम करु नये ही मानसिकता ठेवत असाल, तर अशी मानसिकता असलेल्यांनी हिंदी आणि तेलुगु सिनेसृष्टीत काम करु नये. तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sahkutumb sahaparivar actress annapurna vitthal file complaint against producers and co actors sunil barve reacted dcp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या