sai pallavi Dance on Zingaat Song: बॉलीवूड असो की दाक्षिणात्य सिनेमा, ‘झिंगाट’ गाण्याचे सगळेच चाहते आहेत. २०१६ साली आलेल्या ‘सैराट’ या सिनेमातील हे गाणं आणि सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाले. या सिनेमाच्या हिंदी आणि कानडी आवृत्त्यांमध्येही हे गाणं वापरलं गेलं, त्यामुळे त्याची लोकप्रियता फक्त मराठीपुरती मर्यादित न राहता बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही पोहोचली. नुकतंच दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने या गाण्याच्या हिंदी आवृत्तीवर डान्स केला असून, तिचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
साई पल्लवीने ‘फिदा’, ‘प्रेमम’, ‘लव्हस्टोरी’, ‘काली’, ‘मारी २’ या सिनेमांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. सध्या साई पल्लवी तिच्या बहिणीच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिने नुकत्याच झालेल्या बहिणीच्या लग्नसोहळ्यात मराठी गाण्यावर भन्नाट नृत्य केलं होतं.
Here's the full dance video of Queen Sister's Dance on Marathi song APSARA AALI….?❤️?@Sai_Pallavi92#SaiPallavi #PoojaKannan #SaiPallaviSisterWedding pic.twitter.com/5hwZZQR4oH
— Sai Pallavi FC™ (@SaipallaviFC) September 8, 2024
हेही वाचा…Video : “अप्सरा आली…”, मराठी गाण्यावर थिरकली दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी; बहिणीच्या लग्नात जबरदस्त डान्स
‘अप्सरा आली’ या मराठी गाण्यावर साई पल्लवीने तिच्या बहिणीच्या लग्नात केलेल्या नृत्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. तिच्या दिलखेचक अदांनी आणि नृत्य कौशल्याने तिने चाहत्यांची मनं जिंकली होती. आता तिचा ‘धडक’ सिनेमातील ‘झिंगाट’ या गाण्यावरील नृत्याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. हा डान्स तिने तिच्या बहिणीच्या लग्नसोहळ्यातच केला होता. लग्नानंतरचे अनेक फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्यातच हा व्हिडीओसुद्धा शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये साई पल्लवी तिच्या कुटुंबीयांसह ‘झिंगाट’ गाण्यावर थिरकत असल्याचं दिसत आहे. धडक सिनेमात झिंगाट गाण्याच्या ज्या डान्स स्टेप होत्या, हुबेहुब त्याच स्टेप्स साई पल्लवीने केल्या आहेत. ती तिच्या कुटुंबीयांसह या मराठी गाण्यावर थिरकली आहे. हा व्हिडीओ अनेक फॅन पेजेसवर शेअर केला गेला आहे.
Sai Pallavi dance for Sairat movie song Zingaat ❤️?@Sai_Pallavi92#SaiPallavi #SaiPallaviSisterWedding pic.twitter.com/BsnSdR3bZ6
— Sai Pallavi (@Sai_PallaviFans) September 8, 2024
साई पल्लवीने निळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढरा पलाझो परिधान करत या गाण्यावर नृत्य केलं आहे. तिच्या लुकला पूरक म्हणून तिने मॅचिंग निळ्या बांगड्या आणि मोत्यांचा हार घातला होता. तिच्या नृत्यावर एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “तिच्या उर्जेशी कोणीही बरोबरी करू शकत नाही,” तर दुसर्या युजरने लिहिलं, “संपूर्ण कार्यक्रमात तिचा डान्स सर्वोत्कृष्ट होता.”
साई पल्लवीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटात सीतेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच रणबीर कपूरबरोबर काम करणार आहे. यासोबतच ती ‘थंडेल’ सिनेमातही झळकणार आहे, ज्यामध्ये नागा चैतन्य तिच्या सहकलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.