मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. ‘हंटर’ चित्रपटाद्वारे सईने बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं. आता मराठमोळी सई चक्क आंतरराष्ट्रीय भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. बॉलिवूडच्या काही दिग्गज कलाकारांसोबत सई ‘लव्ह सोनिया’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटात झळकणार असल्याचं समजतंय. ‘स्लमडॉग मिलेनिअर’फेम अभिनेत्री फ्रिडा पिंटो, अनुपम खेर, पॉल डॅनो, मनोज वाजपेयी, अदिल हुसैन, राजकुमार राव आणि रिचा चढ्ढा आदी कलाकारांसोबत सई ताम्हणकर ‘लव्ह सोनिया’ या हॉलिवूडपटात एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. ‘स्लमडॉग मिलेनिअर’ चित्रपटाचे निर्माते तब्रेज नुरानी हे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत असून, जयपूर येथे ‘लव्ह सोनिया’च्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai tamhankar to act in international movie love sonia
First published on: 26-04-2016 at 17:44 IST