ओह माय सईशाईन

जवळ जवळ १०० वर्षाच्या काळात भारतीय सिनेमाने प्रेक्षकांना अनेक क्लासिक सिनेमे दिले.

मराठी चित्रपट सृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या किलर लुक्स आणि अप्रतिम अभिनय कौशल्याचे लाखो चाहते आहेत.

जवळ जवळ १०० वर्षाच्या काळात भारतीय सिनेमाने प्रेक्षकांना अनेक क्लासिक सिनेमे दिले. बॉलीवूड सिनेमांचा प्रेक्षकांवर नेहमीच अधिक प्रभाव राहिल्यामुळे बॉलीवूड सिलेब्रीटीजच्या चाहत्यांनी कलाकारांना डोक्यावर उचलून धरले आहे. मराठी सिनेमाच्या वाढत्या कलामुळे मराठी कलाकारांची फॅनफोलोविंग देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रत्येक कलाकाराला यशाच्या शिखरा पर्यंत पोहोचवण्या मागे नेहमीच त्यांच्या चाहत्यांचे प्रेम असते.

मराठी चित्रपट सृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या किलर लुक्स आणि अप्रतिम अभिनय कौशल्याचे लाखो चाहते आहेत. तिच्या याच लाखो चाहत्यामधील एकविकी राठोड नावाचा एक असा क्रेझी फॅन असा आहे ज्याने नेहमीच सईचे लक्ष वेधून घेण्यसाठी विलक्षण गोष्टी केल्या आहे. विकी सईचा इतका मोठा फॅन आहे कि त्याने त्याच्या मनगटावर सईच्या नावाच्या टॅटू देखील बनवला आहे. इतकेच नव्हे तर त्याने ट्विटर या सोशिअल नेट्वर्किंग वेबसाईटवर ‘ओह माय सईशाईन’ नावाचे ट्विटर अकाउंट बनवले आहे ज्यामधून तो फक्त सईसाठी ट्विट करतो. सई जिथे पण जाईल तिथे हा तिचा चाहता तिच्या स्वागतासाठी तयार असतो.
सईवर आपली वेगळी छाप पडणाऱ्या विकीला त्याच्या वाढदिवसानिमित्त सईने स्वतः आश्चर्याचा धक्काच दिला. नेहमी सईला स्पेशल ट्रीटमेंट देणाऱ्या विकीला सईने एक खास सरप्राईज दिले. सईने तिच्या सर्वात मोठ्या फॅन साठी एक ट्रेजर हंट ठेवला आणि शेवटच्या क्लूचे अचूक उत्तर देऊन विकिला सईला भेटायची संधी मिळाली. वाढदिवसाच्या दिवशी चक्क स्वतः सईने सरप्राईज दिल्याचा सुखद धक्का विकिला मिळाला. आपल्या बिझी शेड्युल मधून वेळ काढून सईने दिलेलं सरप्राईज आणि सोबत साजरा केलेला वाढदिवस हा सुखद अनुभव विकीच्या नेहमीच स्मरणात राहील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sai tamhankars biggest fan