‘राणी मुखर्जीला किस करणे…’, सैफ अली खानने सांगितला धक्कादायक अनुभव

सैफ आणि राणीने हम तुम चित्रपटाच्या वेळी किसिंग सीन दिला होता.

saif ali khan, rani mukerji, bunty aur babli 2, hum tum, hum tum kiss, saif rani kiss, saif ali khan rani mukerji kiss, bunty aur babli,

एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी जोडी म्हणजे अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिनेता सैफ अली खान. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते आणि त्यांची जोडी त्यावेळी हिट ठरली होती. त्यांचा ‘हम तुम’ हा चित्रपट विशेष गाजला होता. या चित्रपटात त्यांनी एक किसिंग सीन दिला होता. आता एका व्हिडीओमध्ये त्यांनी या किसिंग सीनवर वक्तव्य केले आहे.

लवकरच सैफ आणि राणीची ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने यशराज फिल्मसने त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर सैफ आणि राणीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा एकत्र काम करण्याविषयी वक्तव्य केले. राणीने ‘तुला आठवत का पहिल्यांदा किसिंग सीन देताना आपण किती घाबरलो होतो’ असा प्रश्न सैफला केला होता. त्यावर सैफने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
आणखी वाचा : ‘या’ कारणामुळे समांथा आणि नागाचैतन्यचा झाला घटस्फोट?

‘माझ्यासोबत किसिंग सीन देताना तू फार घाबरली होती. मी सेटवर आलो तेव्हा तू इतर वेळी पेक्षा माझ्याशी खूप चांगलं बोलत होतीस. मी कसा आहे? काय सुरु आहे? असा प्रश्न देखील तू त्यावेळी विचारला होता’ असे सैफ म्हणाला होता.

त्यानंतर त्याने पटकन राणी मुखर्जीला किस करणे अनकन्फर्टेबल झाले होते असे हसत म्हटले. ‘एकमेकांना किस करताना आम्ही लाजत होतो. तो सीन आमच्यासाठी अनकफर्टेबल होता. चित्रपटांच्या इतिहासातील तो अतिशय वाईट किसिंग सीन असले’ असे सैफ पुढे म्हणाला.

येत्या १९ नोव्हेंबरला ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी राणी आणि सैफने ‘हम तुम’, ‘तारा रम पम’ आणि ‘थोडा प्यार थोडा मॅजिक’ चित्रपटात एक दिसले होते. आता जवळपास १२ वर्षांनंतर ते पुन्हा ‘बंटी और बबली २’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Saif ali khan recalls uncomfortable hum tum kissing shot with rani mukerji avb

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!