scorecardresearch

रिंकू राजगुरुची छेड काढणाऱ्याला अटक

रिंकू राजगुरु हिची छेड काढल्याप्रकरणी दत्तात्रेय गरत या तरुणाला पोलिसांनी अटक केले आहे.

रिंकू राजगुरुची छेड काढणाऱ्याला अटक
रिंकू राजगुरु

संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणारी ‘सैराट’फेम अभिनेत्री आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु हिचे राज्यातच नाही तर देशभरात लाखो चाहते आहेत. आर्चीची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते उतावीळ असतात. मात्र, सोलापूरमधील अकलूजला एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने रिंकूची छेड काढल्याची घटना समोर आली असून, या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

रिंकू राजगुरु हिची छेड काढल्याप्रकरणी दत्तात्रेय गरत या तरुणाला पोलिसांनी अटक केले आहे. सोलापूर येथील अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर आरोपी ठाण्याचा रहिवासी असल्याचे कळते. तसेच कलम ३५४ (ड) अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुरुवारी सुनावणी होणार आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने रिंकू राजगुरु हिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटाने रिंकूला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले. या चित्रपटानंतर तिच्या चाहत्यांची संख्या इतकी वाढली की, ती जिथे जाईल तिथे तिचा लोक पाठलाग करतात. त्यामुळे तिला एक-दोन वेळा धक्काबुकीच्या घटनांचाही सामोरा करावा लागला होता.

दरम्यान, रिंकू सध्या दहावीची परीक्षा देत असून ती लवकरच ‘सैराट’च्या कन्नड रिमेकमध्ये झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2017 at 08:37 IST

संबंधित बातम्या