scorecardresearch

Premium

‘सैराट’चा गुजराती आणि तेलगूमध्ये रिमेक!

‘सैराट’च्या रिमेकमध्ये कोणते अभिनेता-अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार याबाबत उत्सुकता आहे.

Sairat , remake, Gujarati movies, Telugu movies, Entertainment, Nagraj Manjule, आर्ची, सैराट, परशा, सल्या, लंगड्या, आनी , Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
Sairat might be remake : बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने ५५ कोटींची 'न भूतो न भविष्यति' अशी तुफान कमाई केली आहे.

सध्या राज्यभरात धुमाकूळ घालत असलेल्या ‘सैराट’ या चित्रपटाचा लवकरच गुजराती आणि तेलुगू भाषेत रिमेक होणार असल्याचे वृत्त आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटातील आर्ची आणि परशा या मुख्य व्यक्तिरेखांसह सल्या, लंगड्या, आनी या व्यक्तिरेखांना मराठी प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने ५५ कोटींची ‘न भूतो न भविष्यति’ अशी तुफान कमाई केली आहे. ‘सैराट’ची हीच लोकप्रियता लक्षात घेऊन या चित्रपटाचा गुजराती आणि तेलगूमध्ये रिमेक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपट निर्माते आणि वितरक गिरीश जोहर यांनी सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवरुन ‘सैराट’ सिनेमाचा रिमेक करणार असल्याची माहिती दिली आहे.

मात्र,’सैराट’च्या रिमेकमध्ये कोणते अभिनेता-अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार याबाबत उत्सुकता आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटाच्या निर्मिती-दिग्दर्शनाची जबाबदारी कोण घेणार ही माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-05-2016 at 19:13 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×