जर ‘ते’ मुसलमान असतील, तर मग मी नाही – सलीम खान

एक सच्चा मुसलमान होण्यासाठी पैंगबर आणि कुराणाचे अनुकरण करावे लागते.

मुलगा सलमान खानसोबत सलीम खान (File Photo)

अभिनेता इरफान खाननंतर आता सलमान खानचे वडील सलीम खान यांनीदेखील ढाकामधील दहशतवादी हल्ल्याची कठोर शब्दात निंदा केली. ढाका येथील दहशतवादी हल्लेखोर मुसलमान असतील तर मग आपण मुसलमान नसल्याचे त्यांनी यासंदर्भातील आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. निष्पापांचा बळी घेणे हे मानवतेचा खून करण्यासारखे असल्याचे पैगंबरांनी म्हटले असल्याचे याच ट्विटमध्ये ते म्हणतात. सलीम खान यांनी ढाका हल्ल्याबाबत चार ट्विट्स केली असून, जगभरात सतत अशा प्रकारच्या कारवाया करणारे लोक स्वत:ला मुसलमान म्हणत असल्याचे त्यांनी सुरुवातीच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. एक सच्चा मुसलमान होण्यासाठी पैंगबर आणि कुराणाचे अनुकरण करावे लागते. ह्या व्यक्ती कशाचे अनुकरण करताता हे मला ठाऊक नाही. परंतु, नक्कीच ते इस्लामचे अनुकरण करत नसल्याचे लगेचच केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अशा भ्याड हल्ल्यांचा निंदेशिवाय आपली प्रार्थना अपूर्ण राहील, अशी प्रतिज्ञा या ईदला करू, असा संदेश सलीम खान यांनी त्यांच्या अंतिम ट्विटमध्ये दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Salim khan father of salman khan condemns dhaka attack

ताज्या बातम्या