हॉलिवूड अभिनेत्री सलमान हायेक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो, ट्विट्स आणि पॉडकास्टच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. यावेळी ती चक्क लक्ष्मी देवीच्या फोटोमुळे चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करुन आपण लक्ष्मी देवीच्या भक्तीत लीन झालो आहोत असं तिनं म्हटलं. लक्षवेधी बाब म्हणजे तिच्या या पोस्टवर अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. तिने सलमानचं कौतुक करत भारतातील काही लोक हिंदू धर्माची कशी चेष्ठा करतात असा टोला लगावला आहे.

अवश्य पाहा – “आरे कारशेड सर्व मुंबईकरांची समस्या नाही”; कंगना रणौतचा उद्धव ठाकरेंना टोला

अवश्य पाहा – ऑनस्क्रीन ‘नागिन’चा बोल्ड अंदाज; पाहा मौनी रॉयचं हॉट फोटोशूट

“संपूर्ण जगातील विविध धर्माचे लोक कृष्ण, शिव, आणि हिंदु देवतांची पूजा करतात. धर्माला न मानणारे देखील रामावर प्रेम करतात अन् भगवतगीतेचं अनुसरण करतात. पण दुदैव म्हणजे भारतातील काही लोक भक्तीची चेष्ठा करतात. स्पष्टपणे सांगायचं झालं तर आपण भक्तीची निवड करत नाही तर भक्तीच आपली निवड करते.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने सलमाचं कौतुक केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

 

View this post on Instagram

 

When I want to connect with my inner beauty, I start my meditation focusing on the goddess Lakshmi, who in Hinduism represents wealth, fortune, love, beauty, Māyā (literally meaning “illusion” or “magic”), joy and prosperity. Somehow her image makes me feel joyful, and joy is the greatest door for your inner beauty. Cuando quiero conectarme con mi belleza interior, comienzo mi meditación enfocándome en la diosa Lakshmi, quien en el hinduismo representa la riqueza, la fortuna, el amor, la belleza, Māyā (que literalmente significa “ilusión” o “magia”), alegría y prosperidad. De alguna manera su imagen me trae alegria, y piensa que la alegría es la puerta más directa para tu belleza interior. #innerbeauty #hinduism #lakshmi #meditation

A post shared by Salma Hayek Pinault (@salmahayek) on

यापूर्वी काय म्हणाली होती सलमा हायेक?

“जेव्हा मी माझ्या अंतरंगातील सौंदर्याकडे पाहते, तेव्हा देवी लक्ष्मीचे नाव घेऊन ध्यानाला सुरुवात करते. लक्ष्मी देवी ही हिंदू धर्मात धन, सौभाग्य, प्रेम, सौंदर्य, माया, सुख आणि समुद्धीची देवी आहे. देवी लक्ष्मीचं रुप मला आनंद देतं आणि हाच आनंद आंतरिक सौंदर्याचा मार्ग आहे” अशा आशयाचं ट्विट अभिनेत्रीने केलं होतं.