scorecardresearch

सलमान खानने घेतली तुर्कीच्या मंत्र्यांची भेट, फोटो व्हायरल

त्यावेळी सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ देखील तेथे हजर होती.

सलमान खानने घेतली तुर्कीच्या मंत्र्यांची भेट, फोटो व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून सलमान टायगर ३चे चित्रीकरण तुर्कीमध्ये करत आहे.

बॉलिवूडचा भाईजना सलमान खान लवकरच ‘टायगर ३’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण तुर्की येथे सुरु होते. आता सलमानने चित्रीकरण झाल्यानंतर तुर्कीच्या मंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सलमानने तुर्कीचे सांस्कृतिक व पर्यटन मंत्री मेहमेत नुरी एरसोय यांची भेट घेतली. मेहमेत यांनी स्वत: त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भेटीचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी, ‘बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांची भेट घेतली. ते त्यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. भविष्यातही अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट तुर्कीत शूट केले जातील’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

सलमान आणि कतरिना स्टारर ‘टायगर’ या चित्रपटाचे पहिले दोन भाग प्रेक्षकांच्या पसंतील उरतले. त्यामुळे आता चाहते तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या फ्रॅंचायझीचा पहिला भाग ‘एक था टायगर’चे दिगर्दशन हे कबीर खानने केले होते. हा चित्रपटाची थीम स्पाय थ्रिलर असून हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा दुसरा भाग ‘टायगर जिंदा हैं’ हा २०१७ साली प्रदर्शित झाला होता. आता टायगर ३चे दिग्दर्शन मनीष शर्माने केले आहे. या चित्रपटाचे निर्माता आदित्य चोप्रा आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या