PHOTO : ‘बिग बॉस ११’च्या प्रोमोमध्ये मौनी रॉय?

मौनीचा सेटवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

salman khan, mouni roy
सलमान खान, मौनी रॉय

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मौनीच्या बॉलिवूडमध्ये पदार्पणापासून सलमानचा भावोजी आयुष शर्मासोबत भूमिका साकारण्यापर्यंत अनेक चर्चा ऐकायला मिळाल्या. मात्र ती लवकरच अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. पण त्यापूर्वी मौनी सलमान खानसोबत शूटिंगमध्ये व्यस्त झालीये. ‘बिग बॉस’च्या अकराव्या सिझनसाठी प्रोमोच्या शूटिंगमध्ये दबंग खान आणि मौनी व्यस्त झाले असून सेटवरील त्यांचा फोटोही व्हायरल झालाय.

‘बिग बॉस’चा अकरावा सिझन सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असून नुकताच शोचा लोगो प्रदर्शित झाला. शोच्या प्रोमोचे शूटिंगही गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. या शूटिंगदरम्यानचाच एक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. या फोटोमध्ये सलमान भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीमध्ये तर मौनी पांढऱ्या रंगाचा टॉप आणि जॅकेटमध्ये दिसतेय. याआधी सलमानच मौनीला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याच्या चर्चांमुळे हा फोटो अनेकांचं लक्ष वेधतोय.

https://www.instagram.com/p/BXPo2kuAJks/

VIDEO : ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’वर बच्चे कंपनीचा स्पूफ व्हिडिओ पाहून अक्षयही भारावला

या फोटोमुळे ‘बिग बॉस’च्या नवीन सिझनबाबतही अधिक उत्सुकता वाढली आहे. त्याचप्रमाणे शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धकही जवळपास निश्चित झाले आहेत. नेहमीच वादविवादात असणारा हा शो तितकाच लोकप्रिय आहे. अनेक सेलिब्रिटींसोबतच सर्वसामान्य व्यक्तीही या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होऊ शकतात. मात्र यंदा सामान्य व्यक्तींना मानधन मिळणार नसून ‘बिग बॉस’च्या घरात होणारे वेगवेगळे टास्क आणि शो ला मिळणाऱ्या टीआरपीमुळे फक्त विशेष बोनसच्या स्वरुपातच ते पैसे कमवू शकतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan and mouni roy photo viral while shooting for the big boss 11 promo