सलमान खानच्या ‘अंतिम’ सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज

सलमान खान आणि आयुष शर्माच्या ‘अंति-द-फायनल ट्रुथ’ या सिनेमाचा दमदार ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. मुंबईतील एका शानदार इव्हेंटमध्ये या ट्रेलरचा लॉन्च सोहळा पार पडला. तसचं सोशल मीडियावर देखील हा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. ‘अंतिम’ सिनेमात सलमान खान एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. तर आयुष शर्मा एका गुंडाच्या भूमिकेत झळकेल. या सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर […]

antim-salman-khan

सलमान खान आणि आयुष शर्माच्या ‘अंति-द-फायनल ट्रुथ’ या सिनेमाचा दमदार ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. मुंबईतील एका शानदार इव्हेंटमध्ये या ट्रेलरचा लॉन्च सोहळा पार पडला. तसचं सोशल मीडियावर देखील हा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय.

‘अंतिम’ सिनेमात सलमान खान एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. तर आयुष शर्मा एका गुंडाच्या भूमिकेत झळकेल. या सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं असून निर्मिती सलमान खाननेच केली आहे. या सिनेमात सलमान खानचा पुन्हा एकदा दबंग अंदाज पाहायला मिळणार आहे. राजवीर सिंह असं त्याच्या भूमिकेचं नाव आहे. तर ट्रेलरमधील आयुषचा देखील तडफदार अंदाज अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

आयुषमान खुराना चुकून प्यायला होता बाळासाठी काढलेले ब्रेस्ट मिल्क, पत्नी ताहिराने सांगितला ‘तो’ किस्सा


या ट्रेलरमध्ये सलमान आणि आयुषची अॅक्शन आणि दमदार डायलॉग पाहायला मिळत आहेत. तसचं सिनेमात आयुष शर्माने त्याच्या फिटनेससाठी मोठी मेहनत घेतल्याचं दिसतंय. सलमान खानला या आधीदेखील दबंग अंदाजात प्रेक्षकांनी पाहिलंय. मात्र आयुष पहिल्यांदाच एका हटके भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
२६ नोव्हेंबरला ‘अंतिम’ सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.. मुळशी पॅटर्न या सुपरहिट ठरलेल्या मराठी सिनेमाचा हा रिमेक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan antim movie trailer release kpw

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या