लुलियाच्या सुरक्षेसाठी सलमानने पाठवले अंगरक्षक!

लुलियाला तिच्या गाडीपर्यंत पोहचवताना हॉटेलमधील सुरक्षारक्षकांची चांगलीच दमछाक झाली होती.

Salman Khan , Iulia Vantur , Bollywood, Entertainment, security , Loksatta, Loksatta news, Marahti, Marathi news
Salman Khan & Iulia Vantur : यापूर्वी संजय दत्त येरवाडा तुरूंगातून सुटल्यानंतर सल्लूमियाँने त्याच्या सुरक्षेसाठी मुंबई विमानतळावर त्याचे चार खास अंगरक्षक पाठवले होते.

अभिनेता सलमान खान याची कथित प्रेयसी लुलिया वेंतुर हिला सध्या पूर्वीप्रमाणे कुठेही जाणे सोपे राहिलेले नाही. गेल्या काही दिवसांत सलमान आणि लुलिया यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चेमुळे सध्या लुलियाला जाईल तिथे प्रसारमाध्यमांचा गराडा पडत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर सलमानच्या आईबरोबर असताना आणि अभिनेत्री प्रिती झिंटा हिच्या लग्नाच्या स्वागत समारंभाच्यावेळी लुलियाला याचा चांगलाच प्रत्यय आला होता. यावेळी लुलियाला तिच्या गाडीपर्यंत पोहचवताना हॉटेलमधील सुरक्षारक्षकांची चांगलीच दमछाक झाली होती. याउलट सलमानभोवती नेहमीप्रमाणे अंगरक्षकांची फौज असल्यामुळे त्याला फारसा त्रास सहन करावा लागला नव्हता. मात्र, आता लुलियाची ही अडचण लक्षात घेऊन सलमानने तिची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्याने आपल्या ताफ्यातील काही खास अंगरक्षकांना लुलियाच्या सुरक्षेसाठी पाठविले आहे. आपल्याशी नाव जोडले गेल्यामुळे लुलियाला अशाप्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागणार याची कल्पना असल्यामुळेच सलमानने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. यापूर्वी संजय दत्त येरवाडा तुरूंगातून सुटल्यानंतर सल्लूमियाँने त्याच्या सुरक्षेसाठी मुंबई विमानतळावर त्याचे चार खास अंगरक्षक पाठवले होते. मुंबईत दाखल झाल्यानंतर संजय दत्तने आई नर्गिसच्या समाधीचे आणि सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी हे अंगरक्षक संजय दत्तसोबत वावरत होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan beefs up rumoured girlfriend iulia vantur security

ताज्या बातम्या